कसोटी, ODI आणि T20 आंतरराष्ट्रीय… जाणून घ्या कोणत्या भारतीय फलंदाजाने कोणत्या फॉरमॅटमध्ये वर्चस्व गाजवले

| Updated on: Dec 20, 2022 | 8:29 AM

या फलंदाजांनी यावर्षी भारतासाठी सर्व फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत

कसोटी, ODI आणि T20 आंतरराष्ट्रीय... जाणून घ्या कोणत्या भारतीय फलंदाजाने कोणत्या फॉरमॅटमध्ये वर्चस्व गाजवले
Suryakumar yadav
Image Credit source: bcci twitter
Follow us on

मुंबई : 2022 या वर्षी टीम इंडियाच्या (Team India) खेळाडूंची कामगिरी खराब राहिल्याचं पाहायला मिळालं आहे. कारण टीम इंडियातील अनेक खेळाडू आशिया चषक (Asia Cup 2022) खेळत असताना फॉर्ममध्ये आले आहेत. आशिया चषक यावर्षी टीम इंडियाला जिंकता आला नाही. विशेष म्हणजे ऑस्टेलियात (AUS) झालेल्या T20 विश्वचषक स्पर्धेच्या सेमीफायनलच्या मॅचमध्ये टीम इंडियाचा लाजीरवाणा पराभव झाला. त्यामुळे टीम इंडियाच्या खेळाडूंवरती जोरदार टीका झाली. यावर्षी 6 कसोटी मॅच, 24 एकदिवसीय, 40 टी20 मॅच झाल्या. कुणी चांगली कामगिरी केली थोडक्यात पाहूया.

टीम इंडियाने आतापर्यंत सहा कसोटी सामने खेळले आहेत. सगळ्या मॅचमध्ये टीम इंडियाचा खेळाडू पंत याला संधी देण्यात आली होती. त्याने दहा डावात डावात 64.22 च्या सरासरीने 578 धावा केल्या आहेत. त्यामध्ये पंतने दोन शतकं देखील केली आहेत. त्याचबरोबर तीन अर्धशतकं देखील केली आहेत.

श्रेयस अय्यरने सगळ्या फॉरमॅटमधील मॅच खेळल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने चांगली खेळी केली आहे. श्रेयस अय्यरने वर्षभरात सतरा एकदिवसीय मॅच खेळल्या आहेत. पंधरा डावात त्याने 55.69 च्या सरासरीने 724 धावा केल्या आहेत. त्यामध्ये त्याच्या नावावर एक शतक आणि सहा अर्धशतकं त्याच्या नावावर आहेत. त्याचा स्ट्राईक रेट 91.52 एवढा राहिला आहे.

हे सुद्धा वाचा

यावर्षी सूर्यकुमार यादव या खेळाडूने टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे त्याने आईसीसी टी20 रॅकिंगमध्ये तो एकनंबरवरती आहे. सूर्यकुमार यादवने वर्षभरात 31 मॅच खेळल्या, त्यामध्ये त्याने 46.56 सरासरीने 187.43 स्ट्राईक रेटने 1164 धावा केल्या आहेत. टी20 फॉरमॅटमध्ये अधिक धावा केल्यामुळे सूर्यकुमार यादव सध्या एकनंबरवरती आहे. विशेष म्हणजे त्याने 2 शतक आणि 9 अर्धशतक केली आहेत.