Vinod Kambli : विनोद कांबळीचं ते महारेकॉर्ड आजही आहे अभेद्य, सचिनच काय कोणीच जवळपासही फिरकू शकला नाही!

| Updated on: Dec 13, 2024 | 4:27 PM

विनोद कांबळी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याच्या नावावर असं एक रेकॉर्ड आहे, जे ब्रेक करणं आतापर्यंत कोणालाही शक्य झालं नाही. सचिन तेंडुलकर देखील हे रेकॉर्ड तोडू शकला नाही.

Vinod Kambli : विनोद कांबळीचं ते महारेकॉर्ड आजही आहे अभेद्य, सचिनच काय कोणीच जवळपासही फिरकू शकला नाही!
Follow us on

भारताचा माजी फलंदाज विनोद कांबळी वेगवेगळ्या कारणांमुळे कायम चर्चेत असतो, आता पुन्हा एकदा तो चर्चेत आला आहे. सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांचा एका कार्यक्रमातील व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्या व्हिडीओमध्ये सचिन हा विनोद कांबळीच्या जवळ आला पण त्याला उठून सचिनची नीट भेट देखील घेतला आली नसल्याचं दिसून येत आहे. तसेच याच कार्यक्रमात त्याने आपले गुरू रमाकांत आचरेकर यांच्या आठवणीत एक गाणं म्हटलं यावेळी देखील त्याचे शब्द अडखळत असल्याचं दिसून आलं. विनोद कांबळी याला सध्या अनेक आजारांनी ग्रासलं आहे. आता त्याच्या मदतीला भारताचे 1983 च्या विश्वचषक विजेत्या संघाचे कर्णधार कपील देव धावून आले आहेत.

विनोद कांबळी याला भारतीय क्रिकेट संघात फारशी संधी मिळू शकली नाही, त्यामागे अनेक कारण आहेत, मात्र जी संधी भेटली त्या संधीचं सोनं करत त्याने आपल्या नावावर एक महारेकॉर्ड  तयार केला आहे. हा रेकॉर्ड अजूनही अभेद्य असून सचिन तेंडूलकरसह भारताच्या कोणत्याच दिग्गज फलंदाजाला हा रेकॉर्ड तोडता आलेलं नाहीये.

सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळीचे क्रिकेट कोच एकच होते. रमाकांत आचरेकर सरांनी या दोन महान फलंदाजांना फलांदाजीचे धडे दिले. विनोद कांबळीने क्रिकेटमध्ये  पर्दपणापासूनच धडाकेबाज खेळीला सुरुवात केली. त्याने सुरुवातीच्या सात मॅचमध्ये चार शतक ठेकले ज्यामध्ये त्याच्या दोन द्विशतकांचा समावेश आहे. दुसरीकडे त्याने कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून खेळताना सर्वात कमी सामन्यात 1000 धावा पूर्ण केल्या, त्याने अवघ्या 14 सामन्यात एक हजार धावा पूर्ण केल्या, त्याचं हे रेकॉर्ड आजपर्यंत कोणत्याच फलंदाजाला तोडता आलेलं नाहीये.

भारताचा युवा फलंदाज यशस्वी जैस्वाल हा विनोद कांबळीच्या या रेकॉर्डच्या जवळ पोहोचला होता. मात्र त्याला देखील ते शक्य झाले नाही त्याने 16 सामन्यात एक हजार धावा पूर्ण केल्या. तर विनोद कांबळीने 14 सामन्यात एक हजार धावा पूर्ण केल्या होता. विनोद कांबळीचा हा रेकॉर्ड आजही अभेद्य आहे.