मुंबई : टीम इंडिया (IND) आणि न्यूझिलंड (NZ) यांच्यात उद्यापासून महामुकाबला होणार आहे. T20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडिया न्यूझिलंडमध्ये दाखल झाली आहे. विशेष म्हणजे नुकत्याच ऑस्ट्रेलियात झालेल्या विश्वचषक स्पर्धेत (T20 World Cup 2022) टीम इंडिया आणि न्यूझिलंड टीमचा सेमीफायनलच्या मॅचमध्ये पराभव झाला. टी-20 आणि एकदिवसीय असे एकूण सहा सामने होणार आहेत.
टीम इंडिया पहिल्यांदा सिनिअर खेळाडूंशिवाय न्यूझिलंड दौऱ्यावर आली आहे. हार्दीक पांड्याला टीमची जबाबदारी देण्यात आली आहे. तर व्हीव्हीएस लक्ष्मण यांना प्रशिक्षक म्हणून न्यूझिलंड दौऱ्यावर पाठवण्यात आलं आहे. नवी टीम कशी कामगिरी करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. उद्याच्या सामन्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे.
भारत-न्यूझीलंड T20 मालिकेचे वेळापत्रक
पहिला T20: 18 नोव्हेंबर 2022, दुपारी 12 (वेलिंग्टन)
दुसरा T20: 20 नोव्हेंबर 2022, दुपारी 12 वाजता (माउंट मौनगानुई)
तिसरा T20: 22 नोव्हेंबर 2022, दुपारी 12 वाजता (नेपियर)
पहिला एकदिवसीय: 25 नोव्हेंबर 2022, सकाळी 7:00 (ऑकलंड)
दुसरी वनडे: 27 नोव्हेंबर 2022, सकाळी 7:00 (हॅमिल्टन)
तिसरी वनडे: 30 नोव्हेंबर 2022, सकाळी 7:०० (ख्रिस्टचर्च)
हार्दिक पंड्या (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार), इशान किशन, शुबमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश, मोहम्मद सिराज. अर्शदीप सिंग, उमरान मलिक
शिखर धवन (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार), शुबमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, शाहबाज अहमद, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, दीपक सिंह, चहल. कुलदीप सेन, उमरान मलिक
केन विल्यमसन (कर्णधार), फिन ऍलन, मायकेल ब्रेसवेल, डेव्हन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, डॅरिल मिशेल, अॅडम मिल्ने, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, ईश सोधी, टिम साउथी, ब्लेअर टिकनर.
केन विल्यमसन (कर्णधार), फिन ऍलन, मायकेल ब्रेसवेल, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम, डॅरिल मिशेल, अॅडम मिल्ने, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, टिम साउथी.