मुंबई : मध्यंतरी दुखापतग्रस्त आणि कोरोनाबाधित झाल्याने (Team India) भारतीय संघाचे नेतृत्व हे शिखर धवन याच्याकडे होते. पण आता (K.L.Rahul) के.एल. राहुल हा फीट झाला असून पुढील आठवड्यात झिमबॉम्बे बरोबर होणाऱ्या (One Day Match) वनडे मालिकेत कर्णधार म्हणून के.एल.राहुलच भू्मिका बजावणार आहे. यासंबंधी बीसीसीआयने घोषणा केली आहे. मध्यंतरी काही दिवस कर्णधार पद हे शिखर धवनकडे होते. झिमबॉम्बे दौरा सुरु होण्यापूर्वी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे भारतीय संघ हा के.एल राहुलच्या नेतृ्त्वात कामगिरी करणार आहे. बीसीसीआयने केएल राहुलच्या पुनरागमनाची घोषणा केली आहे. 18 ऑगस्टपासून तीन एकदिवसीय सामने पार पडणार आहेत. हरारे येथे हे सामने होणार आहेत.
यंदाची आयपीएल मालिका संपल्यापासून के.एल.राहुल एकही सामना खेळलेला नाही. त्याच्या आगोदर तो दक्षिण अफ्रिके विरुद्ध टी-20 मालिकेत कर्णधार होता. पण मालिका सुरु होण्यापूर्वी एक दिवस आगोदर तो अनफिट असल्याचे समोर आले होते. त्यामुळे ऐनवेळी ऋषभ पंतला कर्णधार व्हावं लागले होते. त्यानंतरच्या इंग्लड दौऱ्यावऱ्यातील सामन्यांमध्ये तो सहभागी झाला नव्हता. फिटनेस अभवी त्याला बाहेरच थांबावे लागले होते. तर नुकत्याच झालेल्य़ा वेस्ट इंडिज दौऱ्यात राहुलला कोरोना झाला होता. आता फिटनेस टेस्टमध्ये तो पास झाल्यानंतर केएल राहुलला मॅच फिट घोषित करण्यात आले आहे. आशिया कपमध्येही केएल राहुल दिसणार असून त्याला टीम इंडियाचा उपकर्णधार बनवण्यात आलं आहे.
झिमबॉम्बे विरुद्ध तीन एकदिवसीय सामने होणार आहेत. यामध्ये कर्णधार म्हणून के.एल.राहुल, उपकर्णधार शिखर धवन, ऋुतुराज गायकवाड़, शुभमन गिल, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, ईशान किशन, संजू सैमसन, वाशिंगटन सुंदर, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, दीपक चाहल यांचा समावेश असणार आहे.
पहला वनडे: 18 ऑगस्ट (गुरुवार)
दूसरा वनडे: 20 ऑगस्ट(शनिवार)
तीसरा वनडे: 22 ऑगस्ट (सोमवार)