मेलबर्न : रविवारी ऑस्ट्रेलियात (Australia) सुरु झालेल्या विश्वचषक (T20 World Cup 2022) स्पर्धेची रंगत हळूहळू वाढायला सुरुवात झाली. छोट्या टीमची कामगिरी पाहून अनेकांच्या भुवया नक्की उंचावल्या असणार, कारण नामिबियाच्या (Namibia) टीमने श्रीलंका टीमचा पहिल्या सामन्यात पराभव केला. तर स्कॉटलंड टीमने वेस्ट इंडिज टीमचा पराभव केला. त्यामुळे यंदाचा विश्वचषक कोण जिंकणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
काल श्रीलंका टीमचा दुसरा सामना युएईसोबत होता. कालच्या सामन्यात श्रीलंका टीमने सावधगिरी बाळगली होती. कारण पहिल्या सामन्यात पराभव झाल्यानंतर खेळाडूंवर टीका झाली होती. काल झालेल्या सामन्यात युएईच्या युवा खेळाडूने विश्वचषक स्पर्धेतील पहिली हॅट्रीक केली.
कार्तिक मयप्पनचे 15 वी ओव्हर
14.1 षटके – 2 धावा
14.2 षटके – 1 धाव
14.3 षटके – एकही धाव नाही
14.4 षटके – भानुका राजपक्षे, झेलबाद
14.5 षटके – चारिथ असलंका, झेलबाद
14.6 षटके – दासून शनाका, क्लीन बोल्ड.
पण कालच्या सामन्या श्रीलंका टीम विजयी झाली. त्यांनी युएसई टीमचा पराभव केला.
संयुक्त अरब अमिराती
सीपी रिझवान (कर्णधार), वृत्त अरविंद, चिराग सुरी, मुहम्मद वसीम, बासिल हमीद, आर्यन लाक्रा, जवर फरीद, काशिफ दाऊद, कार्तिक मयप्पन, अहमद रझा, जहूर खान, जुनैद सिद्दीकी, साबीर अली, अलीशान शराफू, अयान माझे.
श्रीलंकेचा संघ
दासुन शनाका (कर्णधार), दानुष्का गुनाथिलक, पथुम निसांका, कुसल मेंडिस, चरित अस्लांका, भानुका राजपक्षे, धनंजय डी सिल्वा, वानिंदू हसरंगा, महिश तिक्षा, जेफ्री वांडर्से, चमुना चमुना, चमिना दशमन ), लाहिरू कुमारा , दिलशान मदुशंका, प्रमोद मदुशन.