सोशल मीडियावर क्रिकेट खेळाडूंचे (Cricket Player) अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये जगभरातील खेळाडू आहेत. नुकताच एक व्हिडीओ व्हायरल (Video Viral) झाला आहे. इटली आणि स्वित्झर्लंड यांच्यात एक दहा ओव्हरचा सामना झाला. तो सामना पाहण्यासाठी मोठा प्रेक्षकवर्ग हजर होता. विशेष म्हणजे इंग्लंडचा माजी फिरकी गोलंदाज ग्रॅमी स्वान (Graeme Swann) हा सुद्धा मॅच पाहण्यासाठी आला होता.
इटलीच्या फलंदाजाने जोरदार चेंडू मारला. तो चेंडू सीमेरेषेच्या बाहेर येत असल्याचा अंदाज ग्रॅमी स्वान आला. त्यामुळे त्याने तो कॅच झेप घेऊन पकडला. ज्यावेळी त्याने कॅच पकडला त्यावेळी त्याचं सेलिब्रेशन पाहून चाहत्यांना खूप आनंद झाला.
इतकी वर्षे मैदानाच्या बाहेर असताना सुद्धा ग्रॅमी स्वानने कॅच पडल्यानंतर त्याला प्रचंड आनंद झाला. तो चेंडू घेऊन इकडे तिकडे पळू लागला. काही चाहते त्याच्या पाठीमागे धावू लागले.
And @Swannyg66 grabs another one! Absolute scenes in Cartama? #EuropeanCricketChampionship #ECC22 #CricketinSpain pic.twitter.com/edTwcCrKPQ
— European Cricket (@EuropeanCricket) October 6, 2022
ग्रॅमी स्वानचा तो व्हिडीओ सोशल माीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. तसेच लोकांना त्या व्हि़डीओ अधिक कमेंट केल्या आहेत.
इटली आणि स्वित्झर्लंड यांच्यात झालेल्या सामन्यात काल इटलीने स्वित्झर्लंडचा पराभव केला.