England vs South Africa | कोरोनामुळे एकच वनडे सामना सलग दुसऱ्यांदा रद्द, मालिकाही रद्द होणार?

| Updated on: Dec 06, 2020 | 4:50 PM

एकच सामना सलग दुसऱ्यांदा रद्द करण्यात आल्याने एकदिवसीय मालिका खेळण्यात येणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

England vs South Africa | कोरोनामुळे एकच वनडे सामना सलग दुसऱ्यांदा रद्द, मालिकाही रद्द होणार?
Follow us on

पर्ल : कोरोना व्हायरसमुळे (Corona Virus) दक्षिण आफ्रिका (South Africa) विरुद्ध इंग्लड (England) यांच्यात होणारा पहिला एकदिवसीय सामना पुन्हा एकदा रद्द करण्यात आला आहे. हा सामना पर्ल (Paarl) येथे खेळण्यात येणार होता. मात्र सामन्याच्या काही मिनिटांपूर्वी ही मॅच रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या हॉटेलमध्ये दोन्ही संघाचे खेळाडू थांबले आहेत, त्या हॉटेलमधील 2 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे काही वेळ थांबून थोड्या विलंबाने सामना खेळवण्याचे प्रयत्न होते. मात्र अखेरीस ते ही शक्य झालं नाही. यामुळे हा हा सामना रद्द करण्यात आलं असल्याचं सांगितलं जात आहे. सामना रद्द करण्यात आल्याची माहिती आयसीसीने तसेच दक्षिण आफ्रिकेने ट्विटद्वारे दिली आहे. The match between England and South Africa was canceled for the second time after hotel staff found Corona positive

एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना रद्द करण्याची दुसरी वेळ आहे. याआधी हा सामना 4 डिसेंबरला खेळण्यात येणार होता. मात्र दक्षिण आफ्रिकेच्या संघातील एका खेळाडूला कोरोनाची लागण झाली. यामुळे पहिल्यांदा हा सामना रद्द करण्यात आला. त्यामुळे हा सामना 6 डिसेंबरला नियोजित करण्यात आला होता. मात्र पुन्हा हा सामना रद्द केला गेला.

इंग्लंडच्या खेळाडूंची कोरोना चाचणी

हॉटेलमधील दोन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर इंग्लडने आपल्या खेळाडूंची कोरोना चाचणी केली. दरम्यान अद्यापही या चाचण्यांचा अहवाल आलेला नाही.

एकदिवसीय मालिका रद्द होणार?

कोरोनामुळे सलग एकच सामना दुसऱ्यांदा रद्द करण्याची नामुष्की ओढावली. यामुळे आता ही एकदिवसीय मालिका खेळण्यात येणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. नियोजित वेळापत्रकानुसार ही एकदिवसीय मालिका 4, 7 आणि 9 डिसेंबरला खेळणं अपेक्षित होतं.

टी 20 मालिकेत इंग्लंडचा विजय

या एकदिवसीय मालिकेआधी या दोन्ही संघात टी 20 मालिका खेळण्यात आली. ही मालिका एकूण 3 सामन्यांची होती. या तीनही सामन्यात इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवला. दरम्यान याआधी पाकिस्तानचे एकूण 10 खेळाडूही कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. पाकिस्तानचा संघ न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. न्यूझीलंडला पोहचल्यानंतर या खेळाडूंची काही दिवसांच्या अंतराने कोरोना चाचणी करण्यात आली. यानंतर हे खेळाडू टपप्याटप्याने पॉझिटिव्ह सापडले.

संबंधित बातम्या :

England vs South Africa | दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूला कोरोनाची लागण, पहिला सामना पुढे ढकलला

The match between England and South Africa was canceled for the second time after hotel staff found Corona positive