मुंबई : कतारमध्ये (Qatar) फिफाचं फायनल (FIFA World Cup 2022) पाहायला मिळणार आहे. अर्जेटीना (Argentina) आणि फ्रान्स यांच्यात महामुकाबला होणार आहे. आतापर्यंत दोन्ही संघांनी आपली चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे फायनल पाहण्यासाठी कतारमध्ये चाहत्यांनी अधिक गर्दी होणार आहे. कतारमधील अलिशान जहाजमध्ये फुटबॉलपटू त्यांच्या पत्नी आणि गर्लफ्रेंडसोबत राहत आहेत.
फायनलच्या मॅचमध्ये फुटबॉलपटूच्या पत्नींचा जलवा चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. अनेक खेळाडूंच्या गर्लफ्रेंड आणि पत्नी सोशल मीडियावर अधिक चर्चेत असतात. आतापर्यंत कतारमधील अनेक फोटो फुटबॉलपटूनी आणि गर्लफ्रेंड यांनी शेअर केले आहेत.
थियो हर्नांडेजची बायको जो क्रिस्टोफोली ही सध्या अधिक चर्चेत आहे. कारण तिने तिच्या संपुर्ण शरीरावर टॅटू काढला आहे.जो क्रिस्टोफोली ही मॉडल ही आहे आणि ब्लॉगर सुद्धा आहे. त्यामुळे सोशल मीडियावर तिचे चाहते सुध्दा अधिक आहेत.
जो क्रिस्टोफोली ही आतापर्यंत तिच्या खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत राहिली आहे. विशेष म्हणजे तिने आतापर्यंत केलेल्या अफेअरमुळं ती अधिक चर्चेत होती.