ऑस्ट्रेलियात (Australia) होणाऱ्या T20 World Cup 2022 साठी पाकिस्तानच्या (Pakistan) 15 खेळाडूंची निवड झाल्यापासून पाकिस्तानच्या क्रिकेट बोर्डवरती (Pakistan Cricket Board) अनेक चाहत्यांनी टीका केली आहे. कारण चाहत्यांना अपेक्षित असलेल्या काही खेळाडूंना टीममध्ये संधी मिळालेली नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून क्रिकेट चाहत्यांनी पाकिस्तान बोर्डला अनेक प्रश्न विचारले आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर हा संघर्ष कायम पाहायला मिळणार आहे.
काल खेळाडूंची निवड झाल्यापासून निवड समिती टीकेच्यास्थानी आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या सिलेक्टरकडून एक मोठ वक्तव्य करण्यात आलं आहे. तो म्हणतोय की, होणाऱ्या T20 World Cup मध्ये आम्ही भारताला पुन्हा हरवणार आहे. त्यामुळे त्याची पुन्हा सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात 23 ऑक्टोबरला एक मॅच होणार आहे. त्यावेळी पाकिस्तानची टीम इंडीयाच्या टीमला हरवणार असल्याचं वक्तव्यं मुहम्मद वसीम यांनी केलं आहे.
शोएब मलिकला याला टीममध्ये संधी का नाही दिला याबाबत निवड समितीकडून मौन बाळगण्यात आलं आहे. परंतु भारतीय टीम मागच्यावेळी विश्वचषक स्पर्धेत आम्ही हरवलं होतं. त्याचबरोबर आशिया चषकात सुद्धा आम्ही हरवलं होतं. त्यामुळे आमच्या टीमचा विश्वास वाढला असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं.