सिडनी : ऑस्ट्रेलियाविरोधातील दुसरा कसोटी सामना टीम इंडियाने 8 विकेट्सने (India Beat Australia By 8 Wickets in 2nd Test) जिंकला. यामुळे या मालिकेत दोन्ही संघांनी 1-1 अशी बरोबरी (Border-Gavaskar Trophy) केली आहे. यामुळे तिसऱ्या कसोटी सामन्यात या दोन्ही संघात अटीतटीचा सामना अपेक्षित असणार आहे. मात्र या तिसऱ्या सामन्याआधी ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने मोठी घोषणा केली आहे. (The third Test between Australia and India is scheduled to be played at the Sydney Cricket Ground)
या मालिकेतील तिसरा सामना नियोजित वेळापत्रकानुसार सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर हा सामना खेळण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सिडनीमध्ये कोरोनाचे नव्याने रुग्ण सापडत होते. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून या सामन्याचं नियोजन दुसऱ्या ठिकाणी करण्यात येणार अशी चर्चा होती. मात्र आता ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने याबाबत खुलासा केला आहे. यामुळे आता या प्रश्नाला पूर्णविराम मिळालं आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ट्विटमध्ये काय म्हटलंय?
The @scg has been confirmed as the venue for the Vodafone Pink Test, starting from January 7. Read the full statement here: https://t.co/8sDweeC0Kc pic.twitter.com/r2BKPv3ol9
— Cricket Australia (@CricketAus) December 29, 2020
ऑस्ट्रेलिया बोर्डाने एक पत्रक जाहीर केलं आहे. सिडनीमधील कोरोनाची स्थिती आता नियंत्रणात आहे. यामुळे तिसऱ्या सामना नियोजित वेळापत्रकानुसार खेळला जाऊ शकतो, असं या पत्रकात म्हटलंय.
गेल्या आठवड्याच सिडनीतील उत्तर किनारी भागात कोरोनाचे नवे रुग्ण सापडले होते. यामुळे भितीचं वातावरण तयार झालं होतं. खबरदारी म्हणून न्यू साऊथ वेल्स सरकारने नियम आणखी कडक केले होते.
रोहित शर्माला दुखापतीमुळे पहिल्या 2 कसोटी सामन्यांमधून वगळण्यात आले होते. मात्र रोहित तिसऱ्या सामन्यासाठी सज्ज आहे. मात्र त्याला या सामन्यात खेळण्यासाठी आणखी एक फिटनेस टेस्ट द्यावी लागणार आहे. यामुळे रोहित तिसऱ्या सामन्यात खेळणार की नाही, हे फिटनेस टेस्टच्या निकालावर अवलंबून असणार आहे. मंयक अग्रवालला वगळून रोहितला संघात स्थान देण्यात येऊ शकते.
संबंधित बातम्या :
भारताचा ऑस्ट्रेलियावर ‘विराट’ विजय, कोहलीचं खास ट्विट
Rohit Sharma | रोहित शर्मा तिसऱ्या कसोटीत खेळणार की नाही? मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रीचं मोठं विधान
भारताचा ऑस्ट्रेलियावर ‘विराट’ विजय, कोहलीचं खास ट्विट
(The third Test between Australia and India is scheduled to be played at the Sydney Cricket Ground)