दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (SA) पहिल्या सामन्यात चांगली कामगिरी केल्यामुळे चाहत्यांनी उद्या होणाऱ्या मॅच (Match) आगोदर उत्साह वाढला आहे. उद्या गुवाहाटीत (Guwahati) दुसरी मॅच होणार आहे, त्यामुळे उद्याच्या मॅचमध्ये नव्या खेळाडूंना संधी मिळणार आहे. उद्याच्या मॅचसाठी आताच बुकींग फुल्ल झाल्याची माहिती मिळाली आहे. कारण उद्या रविवार असल्यामुळे मैदानात चाहत्यांचा गोंगाट पाहायला मिळणार आहे.
आशिया चषकात खराब कामगिरी केल्यामुळे चाहत्यांनी निवड समितीसह खेळाडूंना दोष दिला होता. परंतु ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी केल्यामुळे टीम इंडियाने मालिका जिंकली.
उद्या टीम इंडियाची दुसरी मॅच गोवाहाटीत होणार आहे. त्यात उद्या रविवार असल्यामुळे मैदान पुर्णपणे फुल्ल झाल्याचं माहिती मिळाली आहे. चाहते उद्याच्या मॅचमध्ये अधिक गोंधळ घालणार एव्हढं मात्र नक्की.
टीम इंडिया
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विश्व के), दिनेश कार्तिक (विश्व के), हार्दिक पंड्या, आर अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.
दक्षिण आफ्रिका
टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रिले रुसो, डेव्हिड मिलर, एडन मार्कराम, ट्रिस्टन स्टब्स, वेन पेर्नेल, कागिसो रबाडा, अॅनरिक नॉर्खिया, तबरीझ शम्सी, केशव महाराज