T20 विश्वचषकसाठी (World Cup 2022) टीम इंडियामध्ये (India) चांगल्या खेळाडूंना संधी देण्यात आलेली नाही, अशी ओरड टीम इंडियाच्या माजी खेळाडू करीत आहेत. आशिया चषकात खराब कामगिरी झाल्यानंतर टीम इंडियाच्या गोलंदाजीवरती अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तसेच आशिया चषकात खराब कामगिरी झाल्यानंतर सुद्धा अनेकांना संधी मिळाल्याने टीका होत आहे.
मोहम्मद शमी, उमरान मलिक आणि शुभमन गिल या खेळाडूंचा T20 विश्वचषक संघात राखीव खेळाडूंमध्ये समावेश केल्यामुळे दिलीप वेंगसरकर संतापले आहेत. त्यांना मुख्य संघात स्थान का नाही मिळालं असा प्रश्न केला आहे.
आशिया चषकात टीम इंडिया महत्त्वाचे सामने हारल्यानंतर रवी शास्त्री यांनी मोहम्मद शमी घरी तंदुरुस्त असताना त्याला का घेतलं नाही, असा प्रश्न विचारला आहे.
झालेल्या यंदाच्या आयपीएलमध्ये सुद्धा त्यांची कामगिरी उत्तम राहिली आहे. मोहम्मद शमी, उमरान मलिक आणि शुभमन गिल यांना संघात संधी न मिळाल्याने सोशल मीडियावर अनेकांनी निवड समितीवरती सुद्धा जोरदार टीका केली होती.
रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग