मुंबई: टीम इंडियाचा (India) सध्याचा आघाडीचा गोलंदाज सराव करीत असताना जखमी झाला आहे. मोहम्मद शमीच्या (Mohammed Shami) हाताला दुखापत झाल्यामुळे तो एकदिवसीय मालिका खेळणार नसल्याचे जाहीर झाले आहे. त्यामुळे त्याच्या जागेवर कुणाला संधी मिळणार अशी चर्चा होती. परंतु बीसीसीआयने (BCCI) एक ट्विट करीत त्या खेळाडूचं नाव जाहीर केलं आहे. अनेक खेळाडूंसाठी टीम इंडियाचा हा दौरा महत्त्वाचा आहे. कारण पुढच्या वर्षी होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत चांगल्या खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे.
बीसीसीआयने एक ट्विट केलं आहे. त्यामध्ये शमीच्या जागी उमरान मलिक याला संधी देण्यात आल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे बांगलादेश दौऱ्यात मलिक कशी कामगिरी करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. न्यूझिलंड दौऱ्यात त्याने चांगली कामगिरी केली आहे.
टीम इंडिया बांगलादेश दौऱ्यात तीन एकदिवसीय मालिका आणि कसोटी खेळणार आहे. कसोटी मालिकपर्यंत शमीची जखम बरी होईल असं एका रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.
पुढच्या वर्षभरात टीम इंडियामध्ये मोठा बदल करण्यात येणार आहे. कारण मागच्या काही मालिकेमध्ये अनेक खेळाडूंनी खराब कामगिरी केली आहे. त्यामुळे टीम इंडियामध्ये अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात येणार आहे.
एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी (जखमी), मोहम्मद सिराज, दीपक चहर, कुलदीप सेन