मुंबई : टीम इंडियाचा (IND) कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) जखमी झाल्यामुळे टीम इंडियाच्या सगळी जबाबदारी केएल राहूल (Kl Rahul) आणि प्रशिक्षक राहूल द्रविड यांच्याकडे देण्यात आली आहे. टीम इंडियाचा एकदिवसीय मालिकेत पराभव झाला, परवापासून टीम इंडियाची कसोटी मालिका सुरु होत आहे. विशेष म्हणजे पहिली कसोटी अकरा वाजता सुरु होणार होती, परंतु टायमिंग चेंज झाल असून आता नऊ वाजता मॅच सुरु होणार आहे.
टीम इंडियामध्ये अनेक युवा खेळाडू मैदानात पाहायला मिळणार आहे. कारण टीम इंडियाचे अनेक महत्त्वाचे खेळाडू जखमी झाल्यामुळे युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. एकदिवसीय मालिका गमावल्यामुळे कसोटी मॅचमध्ये टीम इंडिया कशी कामगिरी करणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.
टीम इंडिया दिग्गज गोलंदाज आर. अश्विनने आत्तापर्यंत बांगलादेश दौऱ्यात अनेकदा चांगली खेळी केली आहे. त्यामुळे त्याची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. तसेच टीम इंडियामध्ये वरिष्ठ खेळाडूंची कमी आहे.
दोन कसोटी सामने टीम इंडिया बांगलादेशविरुद्ध खेळणार आहे. हे सामने सोनी स्पोर्टस् या वाहिनीवरती पाहायला मिळणार आहेत.