मुंबई : यंदा आयपीएलचा (IPL 2022) सोळावा सीजन होणार आहे, त्यासाठी आतापासून तयारी सुरु झाली आहे. आयपीएलमध्ये खेळणाऱ्या दहा टीमने (Tem team)आपल्या खेळाडूंची यादी बीसीसीआयकडे (BCCI) दिली आहे. त्याचबरोबर ज्या खेळाडूंना टीमने बाहेरचा रस्ता दाखवला. त्यांच्यासाठी डिसेंबर महिन्यात लिलाव होणार आहे. त्यामुळे दहा टीम आपल्यासाठी उपयुक्त खेळाडू कोण आहे हे तपासत आहे. त्याचबरोबर चेन्नई टीममध्ये यावर्षी मोठा बदल पाहायला मिळणार आहे.
इंग्लंड टीमचा दिग्गज फलंदाज जो रुट हा खेळाडू आयपीएल खेळण्यास तयार आहे. डिसेंबर महिन्यात होणाऱ्या लिलावासाठी तो त्याचं नाव देणार असल्याचं त्याने सांगितलं आहे. रुटला किती पैसे मिळतील हे माहित नाही, परंतु मला खेळाचा आनंद घेण्यासाठी आयपीएल खेळणार असल्याचं त्याने जाहीर केलं आहे. त्यामुळे जो रुटला कोणती टीम खरेदी करणार हे पाहावं लागणार आहे.
विशेष म्हणजे पुढच्यावर्षी टीम इंडियामध्ये विश्वचषक स्पर्धा होणार आहे. त्यामुळे अनेक दिग्गज खेळाडूंना यंदाची आयपीएल स्पर्धा खेळायची आहे. महेंद्र सिंग धोनीचं यंदाची शेवटची आयपीएल आहे. आयपीएलच्या शेवटच्या मॅचमध्ये तो निवृत्त होणार असल्याची माहिती मीडियाने दिली आहे.