मुंबई : विश्वचषक स्पर्धेत (T20 World Cup-2022) टीम इंडियाचा सेमीफायनलमध्ये पराभव झाला. त्यानंतर टीम इंडियामध्ये मोठा बदल होणार असल्याचं सुचक वक्तव्य बीसीसीआयकडून (BCCI) करण्यात आलं होतं. विशेष म्हणजे येत्या वर्षभरात टीम इंडियामध्ये मोठा बदल होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. टीम इंडियाचे खेळाडू न्यूझिलंड (IND vs NZ) दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियातून रवाना झाले आहेत. टीम इंडियासोबत यावेळी नवे प्रशिक्षक वीवीएस लक्ष्मण आहेत.
न्यूझिलंडविरुद्धच्या T20 मालिकेसाठी टीम इंडियाचं कर्णधारपद हार्दीक पांड्याकडे देण्यात आलं आहे. न्यूझिलंडविरुद्ध हार्दीक पांड्याच्या नेतृत्वात टीम इंडिया कशी कामगिरी करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. हार्दीक पांड्या कर्णधार पद संभाळण्यास सक्षम असल्याने त्याच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे.
ओपनिंगसाठी शुभमन गिल, ईशान किशन, संजू सैमसन आणि ऋषभ पंत या चार खेळाडूंचा पर्याय हार्दीक पांड्या आणि लक्ष्मण यांच्याकडे आहे. चारही खेळाडूंनी आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे विश्वचषक स्पर्धेत ऋषभ पंत या खेळाडूला संधी देण्यात आली होती. शुभमन गिल या खेळाडूला आतापर्यंत T20 आंतरराष्ट्रीय सामना खेळण्याची एकही संधी मिळालेली नाही. त्यामुळे हार्दीक पांड्या आणि लक्ष्मण संधी देणार का ?
शुभमन गिलने एकही टी20 मॅच टीम इंडियासाठी खेळली नाही. टीम इंडियासाठी गिलने 11 कसोटी सामने आणि 12 एकदिवसीय सामने खेळले आहेत. विशेष म्हणजे एकदिवसीय सामन्यात शुभमन गिलने एक शतक आणि तीन अर्धशतकं लगावली आहेत.