मागच्या काही दिवसांपासून लीजेंड्स लीग क्रिकेटमध्ये (Legends League Cricket) माजी खेळाडू (Player) अधिक चांगली कामगिरी करीत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे चाहत्यांना पुन्हा एकदा खेळाडूंनी खूश केले आहे. काल लीजेंड्स लीग क्रिकेटची अंतिम मॅच झाली. त्यामध्ये गौतम गंभीरच्या (Gautam Gambhir) नेतृत्वाखालील इंडिया कॅपिटल्स ते इरफान पठाणच्या नेतृत्वाखालील भिलवाडा किंग्ज टीमचा पराभव केला. 104 धावांनी पराभव झाल्यामुळे पठाण बंधू नाराज झाले आहेत.
कालच्या सामन्यात इंडिया कॅपिटल्सकडून खेळणाऱ्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. त्यामुळे इंडिया कॅपिटल्स टीम विजयी झाली. कालच्याा सामन्यात रॉस टेलरने चांगली फलंदाजी केली. टेलरने 41 चेंडूत 82 धावा काढल्या. मिचेल जॉनसनने सुद्धा कालच्या सामन्यात चांगली कामगिरी केली आहे.
इंडिया कॅपिटल्स टीमने सुरुवातीला खेळताना 20 ओव्हरमध्ये 211 धावा केल्या होत्या. भिलवाडा किंग्जच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी केली नसल्यामुळे काल त्यांचा पराभव झाला.