सौरव गांगुलीला (Sourav Ganguly) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदावरुन (BCCI President) हटवले जाण्याची शक्यता आहे. मागच्या दोन दिवसांपासून तशी सगळीकडे चर्चा सुरु आहे. माजी क्रिकेटपटू रॉजर बिन्नी (Roger Binny) गांगुलीच्या जागी संधी मिळण्याची शक्यता अधिक आहे. रॉजर बिन्नी हे सुद्धा कपिल देव कर्णधार असताना क्रिकेट खेळले आहेत. 1983 मध्ये ज्यावेळी विश्वचषक जिंकला त्यावेळी टीम इंडियामध्ये होते. बिन्नी हे कर्नाटक क्रिकेट असोसिएशनचे सध्या अध्यक्ष आहेत.
बीसीसीआयच्या सर्व सदस्यांची सामूहिक बैठक होणार आहे. त्यामध्ये रॉजर बिन्नी यांच्या नावाची अधिक चर्चा आहे. विशेष म्हणजे बीसीसीआयचा सदस्य असलेली व्यक्ती निवडणूक लढवू शकते. त्यामुळे रॉजर बिन्नी यांच्या नावाला अधिक पसंती आहे.
BCCI च्या सगळ्या पदांसाठी 11 आणि 12 तारखेला अर्ज करु शकतात. 13 ऑक्टोबर रोजी दिलेल्या कागदपत्रांची छाननी करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे 14 ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागे घेण्याची तारिख आहे. 18 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. विशेष म्हणजे मागच्या काही दिवसांपासून बीसीसीआयचे सचिव जय शाहच्या नावाची अधिक चर्चा होती.
बीसीसीआयचे सचिव जय शाह हे पुन्हा सचिव पदासाठी निवडणुक लढणार असल्याची माहिती मिळाली आहे.