Video : भारताचा हा दिग्गज आता दक्षिण आफ्रिकेवर ‘हल्ला’ करण्याच्या तयारीत

| Updated on: Oct 28, 2022 | 3:44 PM

टीम इंडियाचे दोन फलंदाज विराट कोहली आणि सुर्यकुमार यादव हे सद्या चांगल्या फॉर्ममध्ये असल्यामुळे गोलंदाजांची धुलाई करीत आहेत.

Video : भारताचा हा दिग्गज आता दक्षिण आफ्रिकेवर ‘हल्ला’ करण्याच्या तयारीत
Team india
Follow us on

मेलबर्न : पाकिस्तान (Pakistan) आणि नेदरलॅंडस् (NED) विरुद्ध विजय मिळविल्यानंतर टीम इंडियाची रविवारी दक्षिण आफ्रिकेसोबत (SA) मॅच होणार आहे. ही मॅच पार्थच्या मैदानावर होणार आहे. आतापर्यंत टीम इंडियाच्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे टीम इंडिया विजयी झाली आहे. टीम इंडियाचे दोन फलंदाज विराट कोहली आणि सुर्यकुमार यादव हे सद्या चांगल्या फॉर्ममध्ये असल्यामुळे गोलंदाजांची धुलाई करीत आहेत.

आशिया चषकापासून टीम इंडियाचा सध्याच्या स्टार फलंदाज सुर्यकुमार यादव चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याने ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे रविवारी होणाऱ्या सामन्यात सुद्धा तो चांगली फलंदाजी करेल अशी सोशल मीडियावर कालपासून चर्चा सुरु झाली आहे.

हे सुद्धा वाचा

टीम इंडियाचा तेज गोलंदाज भुवनेश्वरकुमारने सुर्यकमार यादवची एक मुलाखत घेतली आहे. त्यामध्ये आफ्रिकेविरुद्ध कशी खेळी करणार असा प्रश्न विचारण्यात आला आहे. त्यावर प्रत्येक सामन्यात आपल्याला विजय मिळवायचा आहे. त्यामुळे गुणतालिकेत आपला आकडा वाढेल असं उत्तरं दिलं आहे.

टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विश्‍व के.), दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, आर.के. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी.

दक्षिण आफ्रिका टीम

टेंबा बावुमा, क्विंटन डी कॉक, रीझा हेंड्रिक्स, हेन्रिक क्लासेन, केशव महाराज, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, वेन पारनेल, लुंगी एनगिडी, अॅनरिक नॉर्सिया, मार्को जॅन्सेन, कागिसो रबाडा, रिले रोसो, तबरेझ शम्सी आणि ट्रिस्टन स्टब्स.