मेलबर्न : सध्याच्या टीम इंडियामध्ये (Team India) अनेक दिग्गज खेळाडू आहेत. परंतु विश्वचषक (T20 World Cup 2022)स्पर्धा संपल्यानंतर टीम इंडियामधील अनेक दिग्गज तुम्हाला पुन्हा टीममध्ये दिसण्याची शक्यता कमी आहे. त्यामध्ये दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) आणि आश्विन यांच्यासाठी ही शेवटची मालिका असल्याची शक्यता आहे. चेतन शर्माच्या नेतृत्वाखालील निवड समितीने 2024 च्या खेळाचा टप्पा विचारात घेण्याचा निर्णय घेतला आहे. पुढच्या महिन्याच सुरु होणाऱ्या T20 मालिकेसाठी हार्दीक पांड्याला टीम इंडियाचं कर्णधार पदं सोपण्यात आलं आहे.
हार्दिक पांड्याची कर्णधारपदी निवड करुन सध्याची पिढी कर्णधार पदं संभाळण्यासाठी सक्षम असल्याचा संदेश निवड समितीने दिला आहे. विराट कोहली आणि केएल राहूल या दोन फलंदाजांना पुढच्या महिन्यात होणाऱ्या न्यूझिलंडविरुद्धच्या मालिकेत आराम देण्यात आला आहे.
दिनेश कार्तिक याला न्यूझिलंड दौऱ्यात वगळण्यात आले आहे, तर आश्विनला रोहित शर्माने विनंती केल्यामुळे टीममध्ये ठेवले आहे. दिनेश कार्तिक सध्या चांगली कामगिरी करीत आहे. तरी सुध्दा त्या निवड समितीने डावलेले आहे. आफ्रिकेविरुद्धच्या मॅचमध्ये कार्तिकला दुखापत झाली आहे.