मानलं राव पोराला, भल्या-भल्यांना जमलं नाही ते 22 वर्षाच्या पोराने करून दाखवलं

| Updated on: Feb 11, 2023 | 1:38 AM

ऑस्ट्रेलियाच्या मुख्य बॉलर्सना जे जमलं नाही ते 22 वर्षाच्या पोराने करून दाखवलं आहे. 5 विकेट घेतल्यावर पदार्पणवीराने भारतीय फलंदाजांबाबत मोठं वक्तव्य केलंय.

मानलं राव पोराला, भल्या-भल्यांना जमलं नाही ते 22 वर्षाच्या पोराने करून दाखवलं
Follow us on

नागपूर :  भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या नागपूर कसोटी सामन्यामध्ये भारत मजबूत स्थितीत असल्याचं दिसत आहे. कर्णधार रोहित शर्माचं शतक आणि रविंद्र जडेजा आणि अक्षर पटेलच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने 144 धावांची आघाडी घेतली आहे. भारत आता भक्कम स्थितीत असलेला पाहायला मिळत आहे. जडेजा नाबाद 66 आणि पटेल नाबाद 52 धावांवर खेळत आहे. भारताने सात गडी गमावले असून यामधील पाच विकेट्स पदार्पण करणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या 22 वर्षाच्या पोराने घेतल्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे विराट कोहली, केएल राहुल, आर. आश्विन, चेतेश्वर पुजारा आणि केएस भरत यांच्या विकेट पदार्पणवीर टॉड मर्फीने घेतल्या आहेत.

कांगारूंच्या मुख्य गोलंदाजांना जे जमलं नाही ते या नव्या दमाच्या पोराने करून दाखवलं आहे. पहिल्याच सामन्यामध्ये भारतासारख्या संघाच्या त्यांच्यात भूमीत 5 विकेट घेणं मोठी गोष्ट आहे. तुम्हाला माहित नसेल टॉड मर्फीने  मध्यमगती गोलंदाज म्हणून सुरूवात केली होती. मात्र नेटमध्ये सराव केल्यावर त्याला आपल्या स्पिन बॉलिंगमध्ये वेगळंपण दिसून आलं आणि मर्फीने मोठा निर्णय घेत फिरकीपटू म्हणून सुरूवात केली.

पाच विकेट्स घेतल्यावर काय म्हणाला मर्फी?
कसोटीमधील दोन दिवस माझ्यासाठी खास राहिले. पदार्पणाच्या सामन्यात 5 विकेट्स घेणं माझ्या अपेक्षेपेक्षा मोठी गोष्ट आहे. मला आयुष्यभर या प्रदर्शनाचा अभिमान वाटेल, असं टॉड मर्फी म्हणाला. इतकंच नाहीतर, मी जगभर अनेक फलंदाजांना गोलंजदाजी केली मात्र मला वाटतं की भारतीय फलंदाज स्पिनविरूद्ध खेळताना त्यांचा मनगटाचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग करत असल्याचं मर्फीने सांगितलं.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका भारतासाठी खूपच महत्त्वाची आहे. ही मालिका भारताला 3-0 ने जिंकायची आहे. कारण या निकालावरच भारताचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधलं तिकीट निश्चित होणार आहे. जेसन क्रेझानंतर मर्फी हा दुसरा गोलंदाज आहे, ज्याने भारतात पाच गडी बाद करण्याचा विक्रम नोंदवला आहे. क्रेझाने नागपूरच्या मैदानात नोव्हेंबर 2008 साली 8 गडी बाद करत हा विक्रम प्रस्थापित केला होता. तसेच पदार्पणाच्या सामन्यात 5 गडी बाद करण्याच्या यादीत मर्फी ऑस्ट्रेलियाचा 37 वा खेळाडू ठरला आहे.

इंडिया प्लेइंग 11 : रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, एस भरत (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, रविंद्र जाडेजा, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.

ऑस्ट्रेलिया प्लेइंग 11 : पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ, मॅट रेनशॉ, पीटर हँड्सकॉम्ब, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), टॉड मर्फी, नाथन लायन आणि स्कॉट बोलँड.