Tokyo Olympics 2020 Live : टोकियो ऑलिम्पिकमधील शनिवारचा दिवस भारतासाठी संमिश्र राहिला. आणखी एक भारतीय महिला हॉकी संघ आणि डिस्कस थ्रोअर कमलप्रीत कौरच्या विजयाने भारतीयांना आनंद दिला. तर दुसरीकडे जागतिक क्रमवारीतील बॉक्सर अमित पंघाल आणि स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूच्या पराभवामुळे चाहत्यांच्या सुवर्ण पदकाच्या आशा मावळल्या. आज भारत जास्त सामने खेळणार नाहीय. गोल्फ आणि घोडेस्वारी व्यतिरिक्त, पीव्ही सिंधू कांस्य पदकाच्या सामन्यासाठी चीनच्या हीशी भिडणार आहे.
भारतीय पुरुष हॉकी संघाने टोक्यो ओलिम्पिकमध्ये क्वॉर्टर फायनलच्या सामन्यात ग्रेट ब्रिटेनला 3-1 ने नमवत सेमी फायनलमध्ये प्रवेश मिळवला. भारताकडून दिलप्रीत, गुरजंत आणि हार्दिक यांनी गोल केला. 40 वर्षानंतर भारताने सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवला असून बेल्जियम संघासोबत भारताचा सामना असेल.
Chak De India??
Indian men’s hockey team marches on to the semifinal??They beat Britain 3-1 and booked a spot to the penultimate game??#Olympics #Tokyo2020 #TeamIndia pic.twitter.com/rptolVdNnb
— Indian Football Team for World Cup (@IFTWC) August 1, 2021
We are all elated by the stellar performance by @Pvsindhu1. Congratulations to her on winning the Bronze at @Tokyo2020. She is India’s pride and one of our most outstanding Olympians. #Tokyo2020 pic.twitter.com/O8Ay3JWT7q
— Narendra Modi (@narendramodi) August 1, 2021
सिंधूने 13-21 आणि 15-21 अशा दोन सरळ सेट्समध्ये विजय मिळवत सामना जिंकला आहे. या विजयासोबतच सिंधूला कांस्य पदकही मिळाले आहे.
#TeamIndia | #Tokyo2020 | #Badminton
Women’s Singles Bronze Medal MatchYou did it @Pvsindhu1???
Back to back Olympic medals for PV Sindhu! Defeats Bing Jiao to be the 2nd Indian athlete to win 2 individual #Olympics medals. #RukengeNahi #EkIndiaTeamIndia #Cheer4India pic.twitter.com/YfXDvPTpzg— Team India (@WeAreTeamIndia) August 1, 2021
INDIA SCORE A GOAL
Its Dilpreet who puts india on the scoreboard
IND 1-0 GBR#Hockey #Teamindia
Pic C @SonyLIV pic.twitter.com/DbtlJuvXj0
— IndiaSportsHub (@IndiaSportsHub) August 1, 2021
भारत आणि ग्रेट ब्रिटेन या दोन्ही संघात क्वॉर्टर फायनलचा सामना सुरु झाला आहे.पराभूत होणाऱ्या संघाची ऑलिम्पिक वारी आज याठिकाणी संपेल.
सिंधूने शानदार खेळ दाखवत 21- 13 च्या फरकाने पहिला सेट जिंकला आहे. ब्रेकमध्ये सिंधूने 11-8 ची आघाडी घेतली होती. त्यानंतर शेवटपर्यंत अप्रतिम कामगिरी करत सेट जिंकला.
पहिल्या सेटमध्ये ब्रेक झाला असताना सिंधूने आघाडी घेतली आहे. सिंधूने 14-9 ची आघाडी घेतली आहे.
सेमीफायनलमध्ये पराभूत झाल्यानंतर सिंधू किमान कांस्य पदक जिंकण्यासाठी मैदानात उतरली आहे. चीनच्या ही बिंगजियाओसोबत सिंधूच्या सामन्याला सुरुवात झाली आहे.
सिंधू आणि चीनची खेळाडू ही बिंगजियाओ यांच्यात कांस्य पदकासाठीच्या सामन्यासाठी काही वेळात सामना सुरु होणार आहे. दोघी आतापर्यंत 15 वेळा आमने-सामने भिडल्या असून सिंधू केवळ 6 सामने जिंकली असून ही 9 सामने जिंकली आहे.
??? ????? ?? ?? ?
Reigning world champion @Pvsindhu1 will be up against ??’s He Bingjiao in Bronze medal match at @Tokyo2020 Take a look at some stats about where she stands as opposed to her opponent ??#SmashfortheGlory#Badminton#Tokyo2020#Cheer4India pic.twitter.com/L9WNpfTxeR
— BAI Media (@BAI_Media) August 1, 2021
आज पुरुष गोल्फचा शेवटचा राउंड पाडला. यात भारताचे दोन खेळाडू सहभागी होते. अनिर्बान लाहिड़ी एकूण 279 गुण मिळवून 42 व्या स्थानावर होते. त्याने चार राउंडमध्ये 67, 72, 68, 72 असे गुण मिळवले. तर उद्ययन माने याने चार राउंडमध्ये 76, 69, 70, 72 गुण मिळवत एकूण 287 गुण मिळवले. तो 56 व्या स्थानावर होता.
एलेक्सजेंडर ज्वेरेवने रशिया ओलिम्पिक कमिटीच्या केरन खाचानोवला नमवत सुवर्ण पदक जिंकलं. 1988 नंतर स्टेफी ग्राफनंतर जर्मनीसाठी सुवर्णपदक मिळवणारा ज्वेरेव पहिला आहे.
Germany’s pride ?@AlexZverev defeats Karen Khachanov 6-3 6-1 to claim #GER’s second singles gold medal in tennis, 33 years after Steffi Graf at Seoul 1988!#Tokyo2020 | #Tennis | #Olympics pic.twitter.com/3XKfV8Zf53
— ITF (@ITFTennis) August 1, 2021
भारतीय पुरुष हॉकी संघ आज ग्रेट ब्रिटेन संघाविरुद्ध क्वॉर्टर फायनलच्या सामन्यात उतरणार आहे. भारतीय हॉकी संघाने 1980 नंतर अद्यापर्यंत ऑलिम्पिक पदक जिंकलेलं नाही. पण भारताला यंदा ही संधी आहे.
सतीश कुमार तीनही राउंड हरला आहे. सतीश कुमार शेवटचा राऊंड 0: 5 ने हरला. पदकाच्या शर्यतीतून तो आता बाहेर पडला आहे. सतीश कुमार सगळ्या मॅचमध्ये कधीही विजयाच्या स्थितीत दिसला नाही. टॉपसीडसमोर जखमी सतीशने हार मानली नाही आणि प्रयत्न करत राहिला पण अखेर त्याला पराभवाला सामोरं जावं लागलं.
आज उपांत्यपूर्व फेरीत, सतीशचा सामना उझबेकिस्तानच्या बखोदिर जलोलोवशी होणार आहे. जलोलोव्हने अझरबैजानच्या मोहम्मद अब्दुल्लायेवचा 5-0 असा पराभव केला होता.
ऑलिम्पिकमध्ये भाग घेणारा भारताचा पहिला सुपर हेवीवेट (91 किलो प्लस) बॉक्सर सतीश कुमारने पहिल्या सामन्यात जमैकाच्या रिकार्डो ब्राऊनला हरवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. दोन्ही बॉक्सर्ससाठी हे पहिले ऑलिम्पिक आहे.
पुणे
पुणे शहरातील निर्बंध जैसे थे ठेवल्याने व्यापारी आंदोलनाच्या तयारीत
शहरातील दुकानांची वेळ वाढवून देण्याबरोबरच विकेंड लॉकडाऊन मध्ये शिथीतला देण्याची व्यापाऱ्यांची मागणी
मात्र, शहर आणि जिल्ह्यातील पॉझिटिव्हीटी रेट कमी होत नसल्याने प्रशासनाने ठेवले निर्बंध कायम
बॉक्सिंग – पुरुष +91 किलो उपांत्यपूर्व फेरी: सतीश कुमार वि. जलोलोव – सकाळी 9:36 वाजता
बॅडमिंटन – महिला एकेरी कांस्य पदक – पीव्ही सिंधू विरुद्ध ही बिंग जिओ – संध्याकाळी 5:00 वाजता
रविवारी, टोकियो ऑलिम्पिक 2020 च्या नवव्या दिवशी, भारतातील खेळाडू पाच वेगवेगळ्या खेळांमध्ये सहभागी होताना दिसतील. यापैकी दोन खेळांमध्ये भारताला पदके मिळू शकतात.
पदकाच्या इनुषंगाने भारतासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. आज भारताची पीव्ही सिंधू कांस्य पदकाचा सामना खेळणार आहे. तिच्याकडून भारतवासियांना मोठ्या अपेक्षा आहेत.