मेलबर्न : मेलबर्नमधील दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर (Team India Beat Australia By 8 wickets in 2nd Test) 8 विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने 2020 या सरत्या वर्षाचा शेवट गोड केला. 2020 वर्षात कोरोनामुळे अनेक क्रिकेट स्पर्धा या रद्द किंवा स्थगित कराव्या लागल्या. तसेच काही महिने सर्वच ठप्प होतं. या 2020 च्या शेवटाच्या पार्श्वभूमीवर आयसीसीने दशकातील सर्वश्रेष्ठ खेळाडू्ंना पुरस्काराने सन्मानित केलं. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) दशकातील सर्वश्रेष्ठ क्रिकेटपटू या पुरस्काराने गौरवण्यात आलं. मात्र या विराटला 2020 या वर्षात टी 20, एकदिवसीय आणि कसोटीमध्ये एकही शतक लगावता आले नाही. मात्र केएल राहुल (K L Rahul) हिट ठरला आहे. (Top 5 highest scoring batsman in 2020)
सरत्या वर्षाच्या निमित्ताने आपण या तिन्ही फॉर्मेटमधील टॉप 5 फलंदाजांची आकडेवारी पाहणार आहोत.
विशेष म्हणजे या टॉप 5 फलंदाजांमध्ये 4 ऑस्ट्रेलियन फंलदाजांचा समावेश आहे. यामध्ये अनुक्रमे एरॉन फिंच, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लाबुशाने, डेव्हिड वॉर्नरचा समावेश आहे. तर या टॉप 5 मध्ये केएल राहुल हा एकमेव भारतीय फलंदाज आहे.
ऑस्ट्रेलियाच्या एरॉन फिंच हा या वर्षातील वनडे क्रिकेटमध्ये सर्वात यशस्वी फलंदाज ठरला आहे. फिंचने 2020 मध्ये एकूण 13 वनडे सामन्यात 56.08 च्या सरासरीने 2 शतक आणि 5 अर्धशतकांसह एकूण 673 धावा केल्या.
एरॉन फिंच- 13 सामने, 2 शतक-5 अर्धशतक, धावा-673
स्टीव्ह स्मिथ- 10 सामने, 3 शतक-2 अर्धशतक, धावा-568
मार्नस लाबुशाने- 13 सामने, 1 शतक-3 अर्धशतक, धावा-473
डेव्हिड वॉर्नर-12 सामने, 1 शतक-3 अर्धशतक, धावा-465
केएल राहुल-9 सामने, 1 शतक-3 अर्धशतक, धावा-443
टी 20 क्रिकेटमध्ये या वर्षी टॉप 5 फलंदाजांमध्येही केएलचा समावेश आहे. या यादीत राहुल दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर अव्वल क्रमांकावर पाकिस्तानचा मोहम्मद हाफीज आहे. तिसऱ्या क्रमांकावर इंग्लंडचा डी मलन आहे. तर न्यूझीलंडच्या टीम सायफर्ट चौथ्या स्थानावर आहे. तर कतारचा कामरान खान पाचव्या क्रमांकावर आहे.
मोहम्मद हाफीज-10 मॅच, 415 धावा, 4 अर्धशतक
केएल राहुल- 11 मॅच, 404 धावा, 4 अर्धशतक
डी मलन – 10 मॅच, 397 धावा, 4 अर्धशतक
टीम सायफर्ट – 11 मॅच, 352 धावा, 4 अर्धशतक
कामरान खान-7 मॅच, 335 धावा, 3 अर्धशतक
कसोटी क्रिकेटमध्ये वर्षभरात कोणत्याच भारतीय फलंदाजाला आपली छाप सोडता आली नाही. या वर्षात टेस्टमध्ये सर्वोत्तम कामिगरी करणाऱ्या टॉप 5 फलंदाजांमध्ये एकही भारतीय नाही.
टेस्टमध्ये यावर्षी इंग्लंडच्या फलंदाजांनी धमाकेदार कामगिरी केली आहे. टॉप 5 मध्ये 4 फलंदाज हे इंग्लंडचे आहेत. बेन स्टोक्स, डॉम सिबले, जॅक क्राऊली आणि जोस बटलरचा समावेश आहे. तर न्यूझीलंडचा केन विल्यमन्सचाही यात समावेश आहे.
बेन स्टोक्स- 7 मॅच, 641 धावा, 2 शतक-2 अर्धशतक
डॉम सिबले – 9 मॅच, 615 धावा, 2 शतक-2 अर्धशतक
जॅक क्राऊली – 7 मॅच, 580 धावा, 1 शतक-3 अर्धशतक
केन विल्यमन्सन – 4 मॅच, 498 धावा, 2 शतक-1 अर्धशतक
जोस बटलर- 9 मॅच, 497 धावा, 1 शतक-2 अर्धशतक
विराटला आयसीसीने दशकातील सर्वश्रेष्ठ पुरस्काराने गौरवण्यात आलं. मात्र विराटला या वर्षात एकाही फॉर्मेटमध्ये टॉप 5 मध्ये स्थान मिळवता आले नाही. विराट वनडेमध्ये सहाव्या, टी 20 मध्ये सातव्या क्रमांकावर आहे. मात्र दुसऱ्या ठिकाणी टीम इंडियाच्या केएल राहुलचा एकदिवसीय आणि टी 20 मध्ये टॉप 5 मध्ये समावेश आहे. केएलसाठी 2020 हे वर्ष धावांच्या बाबतीत फार चांगलं राहिलं आहे.
संबधित बातम्या :
ICC Awards | विराट कोहली दशकातील सर्वोत्तम क्रिकेटर
(Top 5 highest scoring batsman in 2020)