आजच्या मॅचला श्रीलंका (Shri Lanka) गांभीर्याने घेईल असं वाटतंय, कारण मागच्या मॅचमध्ये नामिबियाक़डून (Namibia) पराभव झाल्यानंतर खेळाडूंवर चाहत्यांनी जोरदार टीका केली होती. रविवारी विश्वचषक (T20 World Cup 2022) सुरु झाल्यापासून अनेक टीमने अनपेक्षित धक्का दिला आहे. विशेष म्हणजे स्कॉटलंडच्या टीमने वेस्ट इंडीजच्या टीमचा पराभव केल्यानंतर अनेकांनी आपल्या भुवया उंचावल्या होत्या.
मागच्या मॅचमध्ये नामिबियाकडून विश्वचषक स्पर्धेत पराभव झाल्यानंतर श्रीलंका टीमचे खेळाडू नाराज झाले होते. जगभरातल्या चाहत्यांनी सोशल मीडियावर त्यांची टिंगल देखील उडविली होती. त्यामुळे आज यूएई टीमने श्रीलंकाविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
श्रीलंका टीम
(प्लेइंग इलेव्हन): पाथुम निसाका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), धनंजय डी सिल्वा, भानुका राजपक्षे, चारिथ अस्लंका, दासून शनाका (कर्णधार), वनिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, दुष्मंथा चमिरा, प्रमोद मदुशन, महेश थेक्षना
यूएई टीम
(प्लेइंग इलेव्हन): चिराग सुरी, मुहम्मद वसीम, काशिफ दाऊद, वृत्ती अरविंद (विकेटकीपर), आर्यन लाक्रा, बासिल हमीद, चुंडगापोयल रिझवान (कर्णधार), अयान अफजल खान, कार्तिक मयप्पन, जुनैद सिद्दीकी, जहूर खान