नवी दिल्ली: BCCIचा अध्यक्ष, भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि क्रिकेटमधला दादा अशी ओळख असलेला सौरव गांगुली सध्या कोलकातामधील वुडलॅन्ड्स रुग्णालयात उपचार घेत आहे. शनिवारी हृदयविकाराचा झटका आल्यानंतर सौरव गांगुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गांगुलीची पत्नी डोनाला फोन करुन त्याच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि सर्वतोपरी मदतीचं आश्वासनही दिलं आहे. (Union Home Minister Amit Shah calls Sourav Ganguly’s wife Dona)
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सौरवच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थनाही केली आहे. तसंच सौरवच्या उपचारांसाठी लागणाऱ्या सर्व मदतीची तयारीही शाह यांनी दर्शवली आहे. शाह यांनी सौरवची पत्नी डोना गांगुलीला फोन करुन सौरवच्या प्रकृतीची माहितीही घेतली आहे. शनिवारी सौरव गांगुली याला हृदयविकाराचा सौम्य झटका आल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गांगुलीच्या स्वास्थ्यासाठी पार्थना केली आहे. “गांगुलीला सौम्य झटका आला, हे ऐकून मला फार दुख झालं. गांगुली लवकरात लवकर बरा व्हावा, अशी मी प्रार्थना करते. आम्ही गांगुलीच्या कुटुंबासोबत आहोत,” असं ट्विट ममता बॅनर्जी यांनी केलं आहे.
Sad to hear that @SGanguly99 suffered a mild cardiac arrest and has been admitted to hospital.
Wishing him a speedy and full recovery. My thoughts and prayers are with him and his family!
— Mamata Banerjee (@MamataOfficial) January 2, 2021
सौरव काल सकाळी जिममध्ये व्यायाम करत असताना त्याच्या डोळ्यासमोर अंधारी येऊ लागली, तसेच त्याच्या छातीत दुखू लागलं होतं. त्यनंतर त्याला कोलकातामधील वुडलॅंड्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याचदरम्यान गांगुलीची कोरोना चाचणी करण्यात आली. ही चाचणी निगेटिव्ह आल्याने डॉक्टर आणि सौरवच्या चाहत्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गांगुलीच्या पत्नीला मदतीचे आश्वासन दिलं आहे.
गांगुली लवकरात लवकर बरा व्हावा, यासाठी अनेक चाहते प्रार्थना करत आहेत. तसेच अनेक क्रिकेटपटूंनी ट्विट करत गांगुलीच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना केली आहे. टीम इंडियाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग, बीसीसीआय अध्यक्ष जय शाह यांनी ट्विटद्वारे गांगुलीच्या प्रकृतीत सुधार व्हावा, यासाठी प्रार्थना केली आहे.
सौरव गांगुलीची क्रिकेट कारकिर्द
सौरव गांगुलीने 113 कसोटी, 311 एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलं आहे. गांगुलीने एकूण 311 सामन्यात 22 शतकांसह 73.71 च्या स्ट्राईक रेटने एकूण 11 हजार 363 धावा केल्या आहेत. तसेच गोलंदाजी करताना त्याने 100 विकेट्सही घेतल्या आहेत. तसेच 113 कसोटींमध्ये त्याने 16 शतकांसह 7 हजार 212 धावा केल्या आहेत. तसेच 32 विकेट्सही त्याने घेतल्या आहेत.
संबंधित बातम्या:
सौरभ गांगुलीला दिलेली जमीन परत घेणार, ममता सरकारकडून प्रक्रिया सुरु
Sourav Ganguly | बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीची 135 दिवसात तब्बल ‘इतक्या’ वेळा कोरोना टेस्ट
Union Home Minister Amit Shah calls Sourav Ganguly’s wife Dona