Chris Gayle | ज्यानं अवघ्या 349 बॉल्सवर 2094 रन्स ठोकल्या, नंतर बॅट रुसली, एका एक रन्सला तरसत राहीला, गेलला काय झालं?

| Updated on: Jan 31, 2021 | 4:05 PM

अबुधाबी टी 10 स्पर्धेत आतापर्यंत ख्रिस गेलची (Chris Gayle) बॅट तळपलेली नाही. गेलला आपल्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही.

Chris Gayle | ज्यानं अवघ्या 349 बॉल्सवर 2094 रन्स ठोकल्या, नंतर बॅट रुसली, एका एक रन्सला तरसत राहीला, गेलला काय झालं?
ख्रिस गेल
Follow us on

यूएई : अबुधाबीमध्ये क्रिकेट प्रकारातील सर्वात कमी षटकांच्या (Abu Dhabi T10 League) स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. कमी षटकांच्या खेळात साधारणपणे फलंदाजांची चलती असते. जोरदार फटकेबाजी करत फलंदाजांना मोठी खेळी करता येते. वेस्टइंडिजचा आक्रमक फलंदाज ख्रिस गेल (Chris Gayle) हा मर्यादित षटकातील स्पेशालिस्ट फंलदाज. गेल गोलंदाजाचा कर्दनकाळ समजला जातो. गेलने मारलेला फटका हा मैदानाबाहेर जातोच. मात्र या टी 10 स्पर्धेत आतापर्यंत गेलची बॅट तळपलेली नाही. गेल मोठी खेळी करण्यात अपयशी ठरत आहे. गेल या स्पर्धेत (Team Abu Dhabi) या संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. (universe boss chris gayle flop in Abu Dhabi T10 League)

गेलला त्याच्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. गेलने या स्पर्धेत आतापर्यंत 2 सामने खेळले आहेत. गेलला या 2 सामन्यात केवळ 9 धावाच करता आल्या. 29 जानेवारीला डेक्‍कन ग्‍लेडिएटर्स विरुद्ध सामना खेळण्यात आला. या सामन्यात गेलने 2 चेंडूत 4 धावा केल्या. यानंतर त्याला इम्तियाज अहमदने क्लिन बोल्ड केलं. यानंतर 30 जानेवारीला कलंदर्स विरुद्ध सामना खेळला गेला. पहिल्या सामन्यात अपयशी ठरलेला गेल या सामन्यात तडाखेदार फलंदाजी करेल, अशी अपेक्षा सर्व गेल चाहत्यांना होती. मात्र गेलने सर्वांचा अपेक्षाभंग केला. गेलला या कलंदर्स विरुद्धच्या मॅचमध्ये 6 चेंडूत 5 धावाच करता आल्या. सुल्तान अहमदने गेलला सोहेल तन्वीच्या हाती कॅच आऊट केलं. त्यामुळे आयपीएलमध्ये गोलंदाजांवर तुटून पडणाऱ्या गेलला या स्पर्धेत एक एक धावेसाठी तरसावे लागत आहे.

गेल जरी पहिल्या 2 सामन्यात अपयशी ठरला तरी तो लवकरच दमदार कमबॅक करेल, अशी आशा त्याच्या चाहत्यांना आहे. गेलचे आयपीएलमध्ये एकसेएक रेकॉर्ड्स आहेत. आयपीएलमध्ये सर्वाधिक वैयक्तिक धावांचा विक्रम गेलच्या नावावर आहे. गेलने नाबाद 175 धावांची खेळी केली आहे. तसंच गेलने 349 बॉल्सवर 2 हजार 94 धावा ठोकल्या आहेत. गेलने या धावा केवळ सिक्सच्या माध्यमातून केल्या आहेत. म्हणजेच गेलने आयपीएलमध्ये सर्वाधिक 349 उत्तुंग षटकार खेचले आहेत.

संबंधित बातम्या :

IPL 2021 | ठरलं, आयपीएलच्या आगामी 14 व्या मोसमाचं आयोजन भारतातच

Chris Gayle | षटकारांचा बादशाह ख्रिस गेलचा नवा विक्रम, T20 मध्ये एक हजार षटकार ठोकणारा पहिला फलंदाज

(universe boss chris gayle flop in Abu Dhabi T10 League)