टीम इंडियामधील आघाडीचा फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) याला दिल्लीत उर्वशी रौतेलाला (Urvashi Rautela) भेटायचं होतं. परंतु ऋषभ पंत याने तिला भेटण्यासाठी नकार दिल्याने दोघांमध्ये वाद सुरु झाला. सोशल मीडियावर (Social Media) दोघांच्या चाहत्यांनी त्यांची टिंगल देखील उडवली आणि मज्जा देखील घेतली. त्यामुळे दोघांच्यातला वाद अजून मिटलेला नाही. उर्वशी रौतेला आशिया चषका दरम्यान प्रेक्षकांमध्ये दिसल्याने पुन्हा दोघांची चर्चा सुरु झाली होती. उर्वशी रौतेलाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर नुकताचं व्हायरल झाला आहे. त्यामध्ये ती हात जोडताना दिसत आहे.
इन्स्टंट बॉलीवूड नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये उर्वशी रौतेलाला ऋषभ पंतला काय मॅसेज द्यायचा आहे असं विचारण्यात आलं त्यावर ती एकदम गप्प झाली. त्यानंतर पुन्हा प्रश्न विचारणाऱ्याने तिला इतक्या दिवस ज्या काही चर्चा सुरु झाल्या आहेत, त्यावर प्रश्न विचारला. अखेरीस वैतागलेल्या उर्वशी रौतेलाने मी उर्वशी आहे असं म्हणत हात जोडले. तो व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाला आहे.
इतक्या दिवसांपासून सुरु असलेल्या चर्चेला उर्वशी रौतेलाने अखेरीस पुर्णविराम दिल्याचे संकेत आहेत.