मागच्या काही दिवसांपासून उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) अधिक चर्चेत आहे. तिच्या सोशल मीडियाच्या (Social Media) अकाऊंटवरुन शेअर केलेल्या पोस्टमधून चाहते अनेक अर्थ काढत आहेत. क्रिकेटर ऋषभ पंत (rishab pant) आणि उर्वशी रौतेलाची खूप दिवसांपासून सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. आशिया चषक सुरु असताना दुबईमध्ये ती क्रिकेटच्या प्रेक्षकांमध्ये दिसल्याने तीची अफेअरची अधिक चर्चा झाली होती.
‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा एक व्हि़डीओ तिच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला होता. त्यावेळी चाहत्यांनी तो व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक व्हायरल केला. त्याचबरोबर कमेंटमध्ये उर्वशी रौतेला प्रश्न विचारले होते.
त्यावर आता उर्वशी रौतेलाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. ती म्हणते तो एका माझ्या शुटिंगचा भाग होता. त्यामुळे त्याची अधिक चर्चा नसावी. त्याचबरोबर तिने इन्स्टाग्रामच्या स्टेटसला एक स्टोरी ठेवली आहे.
क्रिकेटर ऋषभ पंतच्या वाढदिवसाला सुध्दा उर्वशी रौतेलाने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.