नवी दिल्ली : जगभरातील टेनिस चाहत्यांसाठी (US Open Grand Slam) आनंदाची बातमी आहे. टेनिसची सर्वात मोठी आणि लोकप्रिय स्पर्धा ‘यूएस ओपन ग्रॅण्डस्लॅम’ अखेर होणार आहे, तसे संकेत युनायटेड स्टेट्स टेनिस असोसिएशनने दिले आहेत. याबाबत लवकरच अधिकृत घोषणा होणार आहे. या स्पर्धेसाठी जे महत्त्वाचे करार करावे लागतात ते जवळपास पूर्ण झाले (US Open Grand Slam) आहेत, अशी माहिती आहे.
ही स्पर्धा येत्या 31 ऑगस्ट ते 13 सप्टेंबरदरम्यान घेतली जाण्याची शक्यता आहे. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करत या स्पर्धेचं आयोजन केलं जाईल, असा निर्णय आयोजकांनी केला आहे. म्हणजेच स्पर्धेदरम्यान चाहते आणि माध्यमांना स्डेडिअमच्या आत परवानगी नसेल. यापूर्वी ग्रॅण्डस्लॅम विंबलडन स्पर्धाही कोरोनामुळे पढे ढकलण्यात आली होती.
अनेक मोठे खेळाडू कोर्टपासून दूर राहण्याची शक्यता
टेनिस चाहत्यांना टेनिस कोर्टवर सामने पाहायला मिळतील. मात्र, यंदा अनेक मोठे खेळाडू या स्पर्धेपासून दूर राहण्याची शक्यता आहे. जगातील सर्वोतकृष्ट टेनिस खेळाडू सर्बियाचा नोवाक जाकेविच आणि स्पेनचा रफाएल नडाल यांनी सध्याची परिस्थिती पाहता टेनिस कोर्टनमध्ये उतरण्याबाबत शंका व्यक्त केली होती. त्याशिवाय, सर्वोतकृष्ट महिला खेळाडू एशले बार्टीनेही अद्याप यूएस ओपन खेळण्याबाबत निर्णय घेतलेला नाही.
सेरेना विलियम्सनेही अद्याप यूएस ओपनबाबत कुठला निर्णय घेतलेला नाही, अशी माहिती तिच्या प्रशिक्षकांनी दिली. तर, खेळाडू रॉजर फडरर हा दुखापतीमुळे खेळू शकणार नाही. त्यामुळे, यंदाच्या ‘यूएस ओपन ग्रॅण्डस्लॅम‘मध्ये अनेक चाहत्यांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे (US Open Grand Slam).
संबंधित बातम्या :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयसीसीचे नवे नियम
क्रीडाप्रेमींसाठी आनंदाची बातमी! ‘टोक्यो ऑलिम्पिक 2021’च्या तारखा जाहीर
Ishant Sharma | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बदलेल्या नियमावर इशांत आणि चहलची नाराजी