मुंबई: भारतीय संघातील सलामीचा फलंदाज गेल्या काही दिवसांपासून खराब फॉर्ममधून जात आहे.मागच्या काही सामन्यातील त्याची कामगिरी पाहून माजी क्रिकेटपटू आणि वेगवान गोलंदाज वेंकटेश प्रसादनं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्यातही केएल राहुल साजेशी कामगिरी करु शकलेला नाही. 71 चेंडूत 20 धावांची खेळी करून तंबूत परतला. त्यामुळे त्याच्या निवडीवरून वेंकटेश प्रसादनं ताशेरे ओढले आहेत. भारतात इतके गुणवंत खेळाडू असताना ही निवड कशाच्या आधारावर केली असा प्रश्न देखील उपस्थित केला. त्याचबरोबर माजी खेळाडू मूग गिळून गप्प असल्याने संताप व्यक्त केला आहे. वेंकटेश प्रसादनं एका मागोमाग एक असे तीन ट्वीट करत गंभीर आरोप केले आहेत.
“मला केएल राहुलच्या टॅलेंट आणि क्षमतेबद्दल खूप आदर आहे. पंरतु त्याची कामगिरी सध्या तरी खेळाला साजेशी नाही. 46 कसोटी सामने खेळलेल्या केएल राहुलची फलंदाजी सरासरी 34 इतकी आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 8 वर्षांहून अधिक काळ खूपच आहे.त्याला इतक्या संधी दिल्या की त्याचा आपण विचार करू शकत नाही.राहुलची निवड कामगिरीच्या आधारावर नसून पक्षपातावर आधारित आहे.गेल्या 8 वर्षात काहीच करू शकला नाही. इतकं असूनही माजी क्रिकेटपटू मूग गिळून गप्प आहे आहेत.”, असं मत परखडपणे माजी क्रिकेटपटू वेंकटेश प्रसादनं ट्विटरवर मांडलं. “काही लोकांना अजूनही संधी मिळालेली नाही. चांगल्या फॉर्मात असताना अनेक खेळाडू प्रतीक्षेत आहेत. शुभमन गिल चांगल्या फॉर्मात आहे. सरफराज फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत आहे. त्यामुळे या खेळाडूंचा केएल राहुल ऐवजी संधी मिळायला हवी. राहुलच्या कित्येक पटीने मयंक अग्रवाल आणि हनुमा विहारी चांगले आहेत.”, असंही वेंकटेश प्रसादनं पुढे सांगितलं.
Rahul’s selection is not based on performance but favouritism . Has been Consistently inconsistent and for someone who has been around for 8 years not converted potential into performances.
One of the reasons why many ex-cricketers aren’t vocal despite seeing such favouritism..— Venkatesh Prasad (@venkateshprasad) February 11, 2023
“सर्वात वाईट गोष्ट म्हणजे केएल राहुलला उपकर्णधारपद दिलं आहे. खरं तर आर. अश्विनला उपकर्णधारपद देणं गरजेचं होतं. कारण त्याला क्रिकेटची चांगली समज आहे आणि डोकंही..अश्विनला शक्य नसतं तर पुजारा, जडेजाला हे पद दिलं पाहीजे होतं.”, असंही वेंकटेश प्रसादनं पुढे सांगितलं.बॉर्डर गावसकर कसोटी मालिका भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीकोनातून महत्त्वाची आहे. ही मालिका भारताने 3-0 ने जिंकल्यास अंतिम फेरीतील स्थान निश्चित होणार आहे. सध्या भारताने पहिल्या कसोटी विजयानंतर 1-0 ने आघाडी घेतली आहे.
केएल राहुल आतापर्यंत 46 कसोटी सामने खेळला असून त्यात 79 सामन्यात फलंदाजी करण्याची संधी मिळाली. केएल राहुलने 7 शतकं आणि 13 अर्धशतकांच्या जोरावर 2624 धावा केल्या आहेत. कसोटीत 199 ही खेळी सर्वोत्तम ठरली आहे. त्याची फलंदाजी सरासरी 34.07 इतकी आहे.