Video : ऑस्ट्रेलियाच्या स्टार खेळाडूने विराटला लाइव्ह मुलाखतीमध्ये वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या

| Updated on: Nov 05, 2022 | 10:18 AM

विराट कोहलीचा आज 34 वा वाढदिवस आहे.

Video : ऑस्ट्रेलियाच्या स्टार खेळाडूने विराटला लाइव्ह मुलाखतीमध्ये वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या
Virat-Kohli
Follow us on

मेलबर्न : विराट कोहलीचा (virat kohli) आज 34 वा वाढदिवस आहे. परंतु त्याला कालपासून सोशल मीडियावर (Social Media) चाहत्यांच्या शुभेच्छा यायला सुरुवात झाली आहे. #HappyBirthdayViratKohli, #ViratKohliBirthdayCDP, #ViratKohli या हॅशटॅगच्या (Hashtag) माध्यमातून कोहलीला चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा देत आहेत. ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू मॅक्सवेल याने सुद्धा विराट लाईव्ह टिव्हीच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत.

अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रोमांचक मॅच झाली. महत्त्वाच्या मॅचमध्ये ऑस्ट्रेलिया टीमचा विजय झाला. कालच्या मॅचमध्ये मॅक्सवेलने वादळी खेळी केली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाटीमची धावसंख्या 168 झाली होती.

“उद्या माझ्या जीवलग मित्राचा वाढदिवस आहे, त्याला माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. उद्या मी त्याला लिहून शुभेच्छा देणार आहे. त्याचा उद्याचा दिवस चांगला जावा अशा मी त्याला शुभेच्छा देतो.” अशा शुभेच्छा विराट कोहलीला मॅक्सवेलने दिल्या आहेत.

पाकिस्तानच्या गोलंदाज शहनवाज दहानी याने सुद्धा विराट कोहलीला हटके शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे त्याची सोशल मीडियावर अधिक चर्चा आहे.