टीम इंडिया (Team India) विरुद्ध डेव्हिड वॉर्नरला (David Warner) सध्या आराम दिला आहे. कारण पुढील महिन्यात होणाऱ्या टी 20 आंतरराष्ट्रीय स्पर्धेत त्याला चांगली खेळी करता यावी यासाठी त्याला आराम देण्यात आला आहे. सद्या तो आपल्या कुटुंबियांमध्ये अधिक वेळ घालवत आहे, त्याचे अनेक व्हि़डीओ (viral video) सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
डेव्हिड वॉर्नरने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यामध्ये तो आपल्या मुलीसोबत ‘डेंजरस स्विंग’मध्ये मस्ती करताना दिसत आहे. ज्यावेळी ‘डेंजरस स्विंग’सुरुवात होते. त्यावेळी दोघेही ओरडताना व्हिडीओत दिसत आहेत.
विशेष म्हणजे हा व्हिडीओ चाहत्यांच्या अधिक पसंतीला पडला आहे. चाहत्यांनी सोशल मीडियावर अधिक कमेंट सुद्धा केल्या आहेत. ज्यावेळी हा व्हिडीओ डेव्हिड वॉर्नरकडून शेअर करण्यात आला, त्यावेळी त्या आशयामध्ये सगळ्यात जास्त जोरात कोण ओरडलं असं म्हटलं आहे.