कालच्या झालेल्या सामन्यात टीम इंडियाचा (Team India) नऊ धावांनी पराभव झाला. कालच्या मैदानावर पाऊस झाल्यामुळे कमी षटकाचा सामना खेळवण्यात आला होता. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेच्या (SA) खेळाडूंनी 249 धावा केल्या. मैदानात पाऊस झाल्यामुळे सामना (Match) कोण जिंकणार अशी स्थिती मैदानात होती. परंतु टीम इंडियाच्या खेळाडूंनी सुद्धा चांगली कामगिरी पण 9 धावांनी पराभव स्विकारावा लागला.
Deepak Chahar?? pic.twitter.com/zu0wlC76qd
— The Game Changer (@TheGame_26) October 6, 2022
कालच्या सामन्यात टीम इंडियाच्या संजू सैमसनने याने चांगली खेळी केली. त्याने 63 बॉलमध्ये 86 धावा केल्या. कालच्या सामन्यात तो नेहमीप्रमाणे आक्रमकपणे खेळताना दिसला.
पाऊस झाल्यामुळे कालचा सामना कुणाच्या पारड्यात जाणार अशी शक्यता अनेकजण सोशल मीडियावर व्यक्त करीत होते. ज्यावेळी टॉस करण्यात येणार होता. त्यावेळी मुरली कार्तिक सामना किती षटकांचा राहिल याबाबत सांगत होता, विशेष म्हणजे दीपक चहर कॅमेऱ्यामध्ये येऊन मस्ती करीत होता.
दीपक चहरचा तो व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाला आहे.