कालच्या झालेल्या सामन्यात अंतिम ओव्हरमध्ये (Last Over) 11 धावांची गरज होती, त्यावेळी मैदानात काय होणार याची उत्सुकता सगळ्यांना वाटतं होती. त्यावेळी विराट कोहलीने (Virat Kolhi) पहिल्या चेंडूवर षटकार खेचला आणि चाहत्यांच्या चेहऱ्यावर हसू आणलं. पण पुढच्या चेंडूवर विराट बाद झाला आणि सामन्याचं पारडं बदलेलं वाटतं होतं. त्यावेळी पांड्या मैदानात होता. पांड्याने कार्तिकला (Karthik) पाहून मान हालवली आणि सगळीक़े चर्चा सुरु झाली.
Hardik Pandya just winked and told DK – ” Have faith”
हे सुद्धा वाचाThis level of confidence ?#HardikPandya #INDvsAUS pic.twitter.com/M4bk30Lwzl
— Shubhankar Mishra (@shubhankrmishra) September 25, 2022
शेवटच्या ओव्हरमध्ये पांड्याने अनेकदा मॅच जिंकून दिली आहे, तसेच त्यांच्याकडे शेवटच्या ओव्हरमध्ये मॅच जिंकून द्यायची ताकद आहे. आशिया चषकात सुद्धा पांड्याने शेवटच्या चेंडूवर सिक्स लावून मॅच जिंकवली होती.
कालच्या सामन्यात सुद्धा पांड्याने आपल्या स्टाईने चौकार लगावून मॅच जिंकवली. त्यामुळे पुन्हा त्याने कार्तिकला केलेला इशारा व्हायरल झाला आहे.
ज्यावेळी दिनेश कार्तिक खेळायला आला होता, त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावर टेन्शन होतं. परंतु हार्दीक पांड्या मान हालवत आभार दिला. सोशल मीडियावर पांड्या ‘मैं हूं ना’बोलल्याची चर्चा आहे.