काल बाबर आझमचा (Babar Azam) वाढदिवस मेलबर्नमध्ये साजरा झाला. त्यावेळी विश्वचषक स्पर्धेसाठी (T20 World Cup 2022) सहभागी झालेल्या सगळ्या कर्णधारांना आमंत्रित करण्यात आलं होतं. 16 कर्णधारांसमोर बाबर आझमने आपला वाढदिवस साजरा केला. त्यावेळी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) सुध्दा पाहुणा म्हणून उपस्थित होता.
Special guests for the birthday of ?? ©️! ??
हे सुद्धा वाचाWe invited all the team captains at the @T20WorldCup to celebrate Babar Azam’s birthday ?? pic.twitter.com/WZFzYXywsO
— Pakistan Cricket (@TheRealPCB) October 15, 2022
वाढदिवस साजरा झाल्याचं एक ट्विट व्हायरल झालं आहे. त्यामध्ये बाबर आझम केक कापताना दिसत आहे. त्याचबरोबर इतर खेळाडू सुध्दा व्हिडीओ वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत.
काल ज्यावेळी बाबर आझमने केक कापला त्यावेळी रोहित शर्मा अधिक खूश दिसत होता. केक कापल्यानंतर बाबर आझमने तो सगळ्यांना खायला दिला.
टीम इंडियाची आणि पाकिस्तानची 23 ऑक्टोबरला मॅच होणार आहे. त्या मॅचकडे दोन्ही चाहत्याचे लक्ष लागले आहे.
पाकिस्तान टीम
बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, हैदर अली, हरिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी, शान मसूद , फखर जमान.
टीम इंडिया
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विश्व के.), दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, आर.के. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी.