मुंबई : क्रिकेटचा देव म्हणून जो जगभरात ओळखला जातो, मास्टर ब्लास्टर अशी उपमा ज्याला मिळालेली आहे, क्रिकेटमध्ये शतकांचं शकत ज्याने केलं अशा भारतरत्न सचिन तेंडुलकरबाबत वेस्टइंडिजचे महान क्रिकेटपटू सर विवियन रिचर्ड्स यांनी गौरवोद्गार काढले आहेत. रिचर्ड्स यांनी एक व्हिडीओ ट्वीट करत सचिनबद्दल असलेल्या आपल्या भावना आणि प्रेम व्यक्त केलं आहे. Unacademy ने ट्वीट केलेला एक व्हिडीओ रिट्वीट करत रिचर्ड्स यांनी खऱ्या चॅम्पियनचं सार सांगितलं आहे.(Sachin Tendulkar’s special praise from Sir Vivian Richards)
Unacademy ने ट्वीट केलेल्या व्हिडीओमध्ये सचिनच्या क्रिकेट करिअरचा खास आढावा घेण्यात आला आहे. सव्वा दोन मिनिटाच्या या व्हिडीओमध्ये क्रिकेटसारख्या खेळात सचिनची जादू काय होती? सचिनचा खेळ काय होता? आणि सचिन नावाची जादू काय होती? हे मांडण्याचा सुंदर प्रयत्न केला आहे. “यशाचा आवाज मोठा असतो, पण परिश्रमाची शांतता जोरात व्यक्त होते. त्यासाठी स्वप्नांना पुन्हा जिवंत करा, मार्ग पुनर्निमित करा. जे लोक हा मार्ग तोडतात ते हार मान्य करतात”, असं या ट्वीटमध्ये म्हणण्यात आलंय.
The sound of success is loud.
But the silence of hard work speaks louder.
So, rekindle the dreams,
Rebuild the path.
Those who crack it seldom give up,
For passion is undefeatable.#TheGreatestLesson feat. @sachin_rt#SachinUnacademyFilm pic.twitter.com/RF9q1zG6wz— Unacademy (@unacademy) March 2, 2021
सर विवियन रिचर्ड्स यांनी हा व्हिडीओ रिट्वीट करत, “काय व्हिडीओ आहे! खऱ्या चॅम्पियन तेव्हाच कळतो जेव्हा तो यशाच्या मार्गावर परत येतो”, असं म्हटलं आहे. रिचर्ड्स यांचं हे वाक्य म्हणजे सचिनबद्दल असणारा त्यांचा आदर आणि प्रेम व्यक्त करणारं आहे.
What an amazing video!
True champions’ nature is revealed when they work their way back to success everytime they fail. And that’s absolutely why @sachin_rt is a true champion.
Amazing work @unacademy & @sachin_rt ?? https://t.co/5MzClVx7Un
— Sir Vivian Richards (@ivivianrichards) March 2, 2021
Unacademy ट्वीट केलेल्या व्हिडीओमध्ये सचिनची क्रेझ काय होती हे सुरुवातीला पाहायला मिळतं. त्याने मैदानात पाऊल टाकल्यानंतर फक्त सचिन-सचिनच्या आजावानं दुमदुमुन जाणारा आसमंत, सचिनच्या चाहत्यांची उत्कटता, चाहत्यांच्या चेहऱ्यावर सचिनबाबत दिसणारा विश्वास आणि प्रेम सुरुवातीला पाहायला मिळतं. त्यानंतर या व्हिडिओत अचानक शांतता पाहायला मिळते. पुढे सचिन तेंडुलकरची पडलेली विकेट, विविध खेळांडूच्या बाऊन्सरवर त्याला झालेली दुखापत, सचिनची विकेट मिळाल्यानंतर बॉलर्सना होणारा आनंद, विकेट पडल्यानंतर हताश होऊन आकाशाकडे पाहत त्याचं ड्रेसिंग रुमकडे जाणं, त्याच्या चाहत्यांचं निराश होणं दाखवलं आहे.
व्हिडीओच्या दुसऱ्या टप्पाची सुरुवातच अपयश… हे चॅम्पियन्ससाठी एक प्रकारे इंधन असतं अशा वाक्यानं करण्यात आली आहे. पुढे सचिनचा झंझावात, त्यांचे एक-एक शॉट्स, शकत ठोकल्यानंतर त्याचं बॅट उंचावणं आणि चाहत्यांचा गगनाला टेकलेला आनंद दाखवण्यात आला आहे.
संबंधित बातम्या :
फिरकीपटू अश्विन चतुर गोलंदाज, लक्ष्मणने उलगडलं यशाचे रहस्य
Sachin Tendulkar’s special praise from Sir Vivian Richards