मेलबर्न : मागच्या चार दिवसांपासून टीम इंडिया (Team India) आणि पाकिस्तानच्या (Pakistan) मॅच विषयी जोरदार चर्चा सुरु झाली आहे. पण तिथं त्या दिवशी पाऊस पडण्याची अधिक शक्यता असल्याने मॅच (Match)रद्द होण्याची चिन्हं असल्याची माहिती ऑस्ट्रेलियन (Australia) हवामान खात्याने दिली आहे. त्यामुळे चाहते त्या दिवशी निराश होण्याची शक्यता अधिक आहे.
सराव सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केल्यानंतर टीम इंडिया आज मेलबर्नमध्ये दाखल झाली आहे. तिथं दोन दिवस सराव केल्यानंतर टीम इंडियाची पाकिस्तानसोबत मॅच होणार आहे. त्यामुळे आजपासून तिथल्या मैदानावर टीम सराव करणार आहे.
जगभरातील चाहते रविवारच्या मॅचची वाट पाहत आहेत.
टीम इंडिया
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विश्व के.), दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, आर.के. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी.
पाकिस्तान टीम
बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, हैदर अली, हरिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी, शान मसूद , फखर जमान.