मेलबर्न : रविवारी सुरु झालेल्या विश्वचषक (T20 World Cup 2022) स्पर्धेची उत्सुकता अधिक वाढली आहे. कारण नामिबिया (Namibia) टीमने श्रीलंकेच्या (Shri Lanka) तगड्या टीमचा पराभव केला आहे. स्कॉटलंडने वेस्ट इंडिज टीमचा पराभव केला आहे. त्यामुळे यंदाची विश्वचषक स्पर्धा अधिक संघर्षाची ठरणार आहे. कारण आत्तापर्यंत नामिबिया आणि स्कॉटलंड या टीमनी आंतरराष्ट्रीय स्तरावर म्हणावी इतकी चांगली कामगिरी केलेली नाही.
कालच्या मॅचमध्ये स्कॉटलंडच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी केली, त्यामुळे त्यांची धावसंख्या 160 झाली होती. विशेष म्हणजे गोलंदाजांनी सुद्धा चांगली कामगिरी केल्यामुळे स्कॉटलंडच्या टीमचा विजय झाला. वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी खराब खेळी केल्यामुळे त्यांचा पराजय झाला आहे. वेस्ट इंडिज टीममध्ये चांगले खेळाडू आहेत.
I hope this toddler is ok.. #T20WorldCup pic.twitter.com/xM38YyJ9GX
— Menners ? (@amenners) October 17, 2022
काल मॅच सुरु असताना एक मुलगा अचानक बाउंड्री लाईनवर आला आणि तोंडावर पडला. त्यांच्या वडिलांनी त्याला त्यावेळी पकडण्याचा प्रयत्न केला. पण तो वेळीचं हाती न आल्याने तोंडावर पडला. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
वेस्ट इंडिज टीम
निकोलस पूरन (कर्णधार), रोव्हमन पॉवेल, यानिक कारिया, जॉन्सन चार्ल्स, शेल्डन कॉट्रेल, शामराह ब्रूक्स, जेसन होल्डर, अकील होसेन, अल्झारी जोसेफ, ब्रॅंडन किंग, एविन लुईस, काइल मेयर्स, ओबेद मॅककॉय, रेमन रीमोन, ओबेद. स्मिथ
स्कॉटलंड टीम
रिचर्ड बेरिंग्टन (कर्णधार), जॉर्ज मुन्से, मायकेल लीस्क, ब्रॅडली व्हील, ख्रिस सोल, ख्रिस ग्रीव्हज, सफयान शरीफ, जोश डेव्ही, मॅथ्यू क्रॉस, कॅलम मॅक्लिओड, हमजा ताहिर, मार्क वॉट्स, ब्रँडन मॅकमुलेन, मायकेल जोन्स, क्रेग वॉलेस.