मेलबर्न : ज्यावेळी पुष्पा (Pushpa) नावाचा सिनेमा आला होता, त्यावेळी त्या सिनेमाची (Film) गाणी आणि डायलॉग चाहत्यांच्या अधिक पसंतीला पडली होती. पुष्पा सिनेमातील काही डायलॉगचे अनेकांनी व्हिडीओ (Video) तयार केले होते. आजही ती स्टाईल अनेकजण करताना दिसतात. विराट कोहलीने (Virat Kohli) सुद्धा सरावादरम्यान ती स्टाईल केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
रविवारी टीम इंडियाची पाकिस्तानसोबत मॅच होणार आहे. त्यामुळे चाहत्यांनी विराट कोहलीचा तो व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक व्हायरल केला आहे. त्यामध्ये विराट कोहलीने पुष्पाची स्टाईल केली आहे.
World’s best action PushpaRaj “Mai Jhukega Nahi Saala”
.
“Virat Kohli Jhukega Nahi Saala”??@alluarjun
#Pushpa #ViratKohli #TejasswiPrakash pic.twitter.com/ZLrn6WugZA— SNEHA TIWARI (@iam_tiwari) October 18, 2022
विशेष म्हणजे काही चाहत्यांनी विराट कोहलीने पाकिस्तान टीमला पुष्पा स्टाईलमध्ये आव्हान दिल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे विराटचा व्हिडीओ अधिक व्हायरल झाला आहे.
टीम इंडिया
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विश्व के.), दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, आर.के. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी.
पाकिस्तान टीम
बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, हैदर अली, हरिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी, शान मसूद , फखर जमान.