जयपूर : शार्दुल ठाकूरची (Shardul Thakur) भेदक गोलंदाजी आणि श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer)शतकी खेळीच्या जोरावर मुंबईने विजय हजारे करंडकात (Vijay Hazare Trophy 2020-21) राजस्थानवर (Rajasthan) 67 धावांनी शानदार विजय मिळवला. मुंबईने राजस्थानला विजयासाठी 50 ओव्हरमध्ये 318 धावांचे आव्हान दिले होते. पण मुंबईच्या गोलंदाजांनी राजस्थानला 42.2 ओव्हरमध्ये 250 धावांवर ऑल आऊट केलं. त्यामुळे मुंबईचा 67 रन्सनी विजय झाला. मुंबईकडून ‘पालघर एक्सप्रेस’ शार्दुल ठाकूरने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर राजस्थानकडून महिपाल लोमरुरने सर्वाधिक 76 धावा केल्या. (Vijay Hazare Trophy 2020 21 shreyas iyer hit century and shardul thakur take 4 wickets mumbai beat rajasthan by 67 runs)
Mumbai Won by 67 Run(s) #RAJvMUM @paytm #VijayHazareTrophy Scorecard:https://t.co/rYjdUJGkOz
— BCCI Domestic (@BCCIdomestic) February 27, 2021
विजयी आव्हानासाठी मैदानात आलेल्या राजस्थानची निराशाजनक सुरुवात राहिली. राजस्थानने पहिल्या 2 विकेट्स लवकर गमावल्या. यामुळे 32-2 अशी स्थिती झाली. त्यानंतर मनेंदर सिंग आणि महिपाल रोमरुर या दोघांनी राजस्थानच्या विजयाच्या पल्लवित ठेवल्या. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 101 धावांची भागीदारी केली. ही जोडी मुंबईसाठी डोकेदुखी ठरत होती. आकाश पारकरने ही जोडी फोडली. आकाशने मनेंदरला 40 धावांवर पायचीत केलं.
यानंतर मुंबईच्या गोलंदाजांनी राजस्थानच्या एकाही फलंदाजाला मैदानात सेट होऊन दिले नाही. ठराविक अंतराने मुंबईच्या गोलंदाजांनी राजस्थानला धक्के देत विजयी आव्हानाच्या खूप धावांआधी रोखले. मुंबईने राजस्थानला 250 धावांवर ऑल आऊट केलं. राजस्थानकडून लोमरुरने 69 चेंडूत 6 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने सर्वाधिक 76 धावा केल्या. तर मुंबईकडून शार्दुलने 8 ओव्हरमध्ये 50 धावा देत महत्वपूर्ण 4 विकेट्स घेतल्या. तर धवल कुलकर्णीने 3 तसेच प्रशांत सोलंकीने 2 बळी घेत शार्दुलला चांगली साथ दिली. आकाशने 1 पण निर्णायक क्षणी महत्वाची विकेट घेतली.
त्याआधी मुंबईने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. मुंबईकडून कर्णधार श्रेयस अय्यरने शानदार शतकी खेळी केली. श्रेयसने 103 चेंडूत 11 चौकार आणि 3 षटकारांसह तडाखेदार 116 धावा केल्या. तर सलामीवीर यशस्वी जयस्वाल आणि पृथ्वी शॉने अनुक्रमे 38 आणि 36 धावा केल्या. श्रेयसच्या शतकाच्या जोरावर मुंबईने 7 विकेट्स गमावून 317 धावांपर्यंत मजल मारली. राजस्थानकडून एस के शर्माने 3 विकेट्स घेतल्या. अभिमन्यू लांबाने मुंबईच्या 2 फलंदाजांना माघारी पाठवलं. तर रवी बिश्नोई आणि लोमरुरने प्रत्येकी 1 विकेट मिळवली.
मुंबईने या विजयासह विजय हजारे करंडकातील सलग चौथा विजय साजरा केला. मुंबई डी ग्रृपमधील पॉइंट्सटेबलमध्ये 16 पॉइंट्ससह अव्वल क्रमांकावर आहे.
(Vijay Hazare Trophy 2020 21 shreyas iyer hit century and shardul thakur take 4 wickets mumbai beat rajasthan by 67 runs)