नवी दिल्ली : टीम इंडिया युवा सलामीवीर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) विजय हजारे स्पर्धा 2021 (vijay hazare trophy 2021) गाजवतोय. पृथ्वी या स्पर्धेच्या सुरुवातीपासून शानदार कामगिरी करतोय. मुंबई विरुद्ध कर्नाटक यांच्यात स्पर्धेतील दुसरा सेमी फायनल (Karnataka vs Mumbai) सामना खेळवण्यात आला. या सामन्यात पृथ्वीने 165 धावांची धमाकेदार कामगिरी केली. यासह त्याने एका विजय हजारे स्पर्धेतील एका हंगामात सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. पृथ्वीने एका मोसमात सर्वाधिक धावांच्या बाबतीत मयंक अग्रवालला (Mayank Agarwal) पछाडलं आहे. यासह पृथ्वी सर्वाधिक करणारा फलंदाज ठरला आहे. (Vijay Hazare Trophy 2021 Prithvi Shaw broke Mayank Agarwal record for most runs in one season)
Prithvi Shaw becomes the highest run-scorer in a single edition of Vijay Hazare Trophy – 725* runs – beating Mayank Agarwal 723 runs in Vijay Hazare 2018.
— Johns. (@CricCrazyJohns) March 11, 2021
कर्नाटक विरुद्धच्या दुसऱ्या सेमी फायनल सामन्यात पृथ्वीने 122 चेंडूत 135.25 च्या स्ट्राईक रेटने 17 चौकार आणि 7 षटकारांसह 165 धावांची झंझावाती खेळी केली. यासह पृथ्वीने आणखी एक किर्तीमान आपल्या नावे केला. पृथ्वीने 700 धावांचा टप्पा ओलांडला. या स्पर्धेतील एका हंगामात अशी कामगिरी करणारा पृथ्वी पहिला फलंदाज ठरला.
Most runs this season in #VijayHazareTrophy ::
Prithvi Shaw : 754 in 7 games
Highest 227*
Average 188.50
SR 134.88
100s : 4
4s : 95
6s : 21
What performance this is!#VijayHazareTrophy2021 #PrithviShaw pic.twitter.com/b6wuOQqDzT— Crick Academy (@AcademyCrick) March 11, 2021
मयंक अग्रवालने 2017-18 मध्ये विजय हजारे करंडकात 723 धावना चोपल्या होत्या. तर पृथ्वीने अवघ्या 7 सामन्यात 4 शतकांसह 754 धावा कुटल्या आहेत. 227 ही पृथ्वीची सर्वोच्च धावसंख्या आहे.
कर्नाटक विरुद्धचं शतक हे पृथ्वीच्या या स्पर्धेतील चौथं शतक ठरलं. यासह पृथ्वीने एका स्पर्धेत सर्वाधिक शतकांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. पृथ्वीने विराट कोहली आणि देवदत्त पडीक्कलच्या रेकॉर्डशी बरोबरी साधली आहे. या तिघांच्या नावावर प्रत्येकी मोसमात 4 शतकांची नोंद आहे. विराटने 2008-09 मध्ये 4 शतकं ठोकण्याचा कारनामा केला होता. तर देवदत्तने या सुरु असलेल्या स्पर्धेत 4 शतक लगावले आहेत.
संबंधित बातम्या :
(Vijay Hazare Trophy 2021 Prithvi Shaw broke Mayank Agarwal record for most runs in one season)