लंडन : विश्वचषक स्पर्धेत टीम इंडिया आणखी एक धक्का बसला आहे. दुखापतीमुळे अष्टपैलू विजय शंकर विश्वचषकातून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी मयांक अग्रवालला संधी मिळाली आहे. बीसीसीआयने याबाबतची माहिती दिली. कर्नाटकचा मयांक अग्रवाल आता इंग्लंडला रवाना होणार आहे. मयांक अग्रवालने गेल्यावर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत चांगली कामगिरी केली होती. तो अद्याप भारताकडून वन डे सामन्यात खेळला नाही.
BCCI: Vijay Shankar sustained a non displaced fracture of the left big toe, which will require a minimum of three weeks to heal. The injury rules him out of the ongoing World Cup. The Indian team management has requested the ICC to consider Mayank Agarwal as his replacement. https://t.co/HJhswyLmkn
— ANI (@ANI) July 1, 2019
अफगाणिस्तानच्या सामन्यापूर्वी विजय शंकर नेट्समध्ये फलंदाजीचा सराव करत होता. याचवेळी गोलंदाज जसप्रीत बुमराचा यॉर्कर त्याच्या पायावर लागला. यानंतर विजय शंकरला प्रचंड वेदना झाल्या आणि तो माघारी परतला होता. तरीही तो अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात खेळला. मात्र तो चमकदार कामगिरी करु न शकल्याने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात त्याच्याऐवजी ऋषभ पंतला भारतीय संघात स्थान देण्यात आलं होतं.
आता दुखापतीमुळे विजय शंकरला बाहेर पडावं लागलं. त्याच्या जागी कर्नाटकचा स्फोटक सलामीवीर मयांक अग्रवालला टीम इंडियात स्थान देण्यात येणार आहे.
मयांक अग्रवाल गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यात भारताकडून सलामीला उतरला होता. त्यावेळी त्याने एका सामन्यात 76 तर दुसऱ्या सामन्यात 77 धावा केल्या होत्या. मयांक अग्रवालने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. कर्नाटककडून सलामीला उतरताना त्याने अनेक मोठ्या खेळ्या केल्या.
कोण आहे मयांक अग्रवाल?