Vinesh Phogat : ‘केसांचे वजनच 300 ग्रॅम, अडचण होती तर ते कापायचे होते’, विनेश फोगाट हिच्या अपात्रतेवर सासरे राजपाल राठी यांचा संताप

| Updated on: Aug 07, 2024 | 2:34 PM

Vinesh Phogat disqualified : विनेश फोगाट हिच्या विजयाचा आनंद औटघटकेचाच ठरला. तिने महिलांच्या फ्रीस्टाईल 50 किलोग्रॅम वजनात क्युबाच्या युस्नेलिस गुजमॅन लोपेजचा उपांत्य फेरीत पराभव केला. तिला अपात्र ठरवण्यात आल्याने देशात संतापाची लाट उसळली आहे.

Vinesh Phogat : केसांचे वजनच 300 ग्रॅम, अडचण होती तर ते कापायचे होते, विनेश फोगाट हिच्या अपात्रतेवर सासरे राजपाल राठी यांचा संताप
विनेश फोगाटच्या सासऱ्यांचा संताप
Follow us on

पॅरिस ऑलिम्पिकमधून आज सकाळी वाईट बातमी येऊन धडकली. अंतिम फेरीपर्यंत धडक मारणारी भारताची पहिली महिला कुस्तीपटू विनेश फोगाट हिला मोठा धक्का बसला. 50 किलो वजनी गटातील अंतिम फेरीपूर्वी तिला 100 ग्रॅम अधिक भरल्याने अपात्र ठरवण्यात आले. भारताची तिचे वजन कमी करण्यासाठी थोडा कालावधी देण्याची विनंती ऑलिम्पिक अधिकाऱ्यांनी फेटाळली. तिला या स्पर्धेसाठी अपात्र ठरवले. हे वृत्त धडकताच देशभरात संतापाची लाट उसळली.

सासऱ्याने व्यक्त केला संताप

हे सुद्धा वाचा

याप्रकरणी विनेश फोगाट हिचे सासरे राजपाल राठी यांनी संताप व्यक्त केला आहे. ‘याप्रकरणात कट रचल्याचा आरोप नाकारू शकत नाही. केवळ 100 ग्रॅम वजन जास्त असल्याने तिला अयोग्य ठरवण्यात आले. केसांचं वजन 300 ग्रॅम असते. जर इतकीच अडचण होती, तर हे केस कापता आले असते.’ अशी प्रतिक्रिया राठी यांनी आजतक या वृत्तवाहिनीशी बोलताना दिली. विनेश फोगाट हिचे लग्न सोमवीर राठी याच्याशी झालेले आहे. विनेश अंतिम फेरीसाठी धडक मारली. त्यापूर्वी तिने काल जपानच्या युई सुसाकी, युक्रेनच्या ओकसाना लिवाच आणि गुजमॅ लोपेजचा पराभव केला.

फायनलपूर्वीच वाईट बातमी

विनेश हिचा अंतिम सामना अमेरिकेच्या सारा एन हिल्डेब्रांट हिच्याशी होणार होता. या प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी IOA अध्यक्ष पीटी उषा यांच्याशी बोलले आणि पीटी उषा यांच्याकडून या विषयावर आणि विनेशच्या अपात्रतेनंतर भारताकडे कोणते पर्याय आहेत याबद्दल प्राथमिक माहिती घेतली. मोदींनी पी टी उषा यांना विनेशच्या केसमध्ये मदत करण्यासाठी सर्व पर्यायांचा शोध घेण्यास सांगितले. विनेशला मदत होणार असेल तर तिच्या अपात्रतेबद्दल तीव्र निषेध नोंदवावा, असेही त्यांनी पीटी उषा यांना सांगितले आहे.

विनेश झाली बेशुद्ध

या बातमीने देशात संतापाची लाट उसळली. तर विनेश बेशुद्ध पडली. तिला तातडीने पॅरिसमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले. शरीरातील पाणी कमी झाल्याने तिला भोवळ आली. तिला IV फ्लूइड देण्याचा सल्ला दिला आहे. वजन कमी करण्यासाठी विनेशने मोठी कसरत केली. त्याचा विपरीत परिणाम झाला. काल रात्री तिचं वजन 52 किलो भरलं.