झुकेगा नही साला; अंगात जर्सी, हातात बॅट, डोळ्यावर गॉगल; डिस्चार्जवेळी विनोद कांबळी हॉस्पीटलमध्येच खेळला क्रिकेट

| Updated on: Jan 02, 2025 | 6:24 PM

भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून डिस्चार्जवेळी कांबळीचा पुष्पा स्वॅग पाहायला मिळाला. डोळ्यावर गॉगल घालण्यापासून ते अंगात टीम इंडियाची जर्सी घालण्यापर्यंतची त्याची स्टाइल पाहायला मिळाली.

झुकेगा नही साला; अंगात जर्सी, हातात बॅट, डोळ्यावर गॉगल; डिस्चार्जवेळी विनोद कांबळी हॉस्पीटलमध्येच खेळला क्रिकेट
Follow us on

भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीला प्रकृती खालावल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ठाण्याच्या रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु होते. मूत्रपिंडाचा त्रास आणि मेंदूत रक्ताच्या गुठल्या झाल्याने त्याची प्रकृती खालावली होती.

तसेच हॉस्पिटलमध्ये असतानाही विनोद कांबळीचे अनेक व्हिडीओ आणि फोटो समोर आले होते. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ पाहून सर्वांनीच हळहळ व्यक्त केली होती.

डिस्चार्जवेळी विनोद कांबळीचा वेगळाच स्वॅग 

नववर्षाच्या पहिल्याच तारखेला विनोद कांबळीला डिस्चार्ज देण्यात आला. भिवंडीच्या आकृती रुग्णालयातून दहा दिवस उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. आता प्रकृती स्थिर असल्याची माहिती देत कांबळीने सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा देत व्यसनांपासून दूर राहण्याचा सल्लाही दिला आहे.

डिस्चार्जच्यावेळी विनोद कांबळीचा मात्र एक वेगळाच स्वॅग पाहायला मिळाला. रुग्णालयातून डिस्चार्ज घेताना विनोद कांबळीने टीम इंडियाची जर्सी घातली होती, डोक्यावर कॅप, डोळ्यावर गॉगल असा एक वेगळाच स्वॅग पाहायला मिळाला.

तसेच हाती बॅटही घेत ‘मै छोंडूगा नही’ असे म्हणत विनोद कांबळीने पुष्पास्टाईलने हॉस्पिटलमध्येच क्रिकेटही खेळून दाखवले. एवढच नाही तर “झुकेगा नही साला” अशी पुष्पाची सिग्नेचर स्टेपही करून दाखवली.

हॉस्पिटलमधून निघताना मानले सर्वांचे आभार

हॉस्पिटलमधून निघताना त्याने रुग्णालयातील डॉक्टर, स्टाफ व हॉस्पिटलचे मालक यांचे आभार मानले. परिधान करुन मोठ्या कारमधून विनोद कांबळी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी आपल्या घरी परतला

विनोद कांबळी लवकरच मैदानावर परतणार?

दरम्यान विनोद कांबळी लवकरच मैदानावर परतणार असून शिवाजी पार्कच्या मैदानावर छक्के-चौकार लगावण्याची तयारीत असल्याचं त्याने म्हटलं. तसेच सचिन तेंडुलकरसोबत पुन्हा एकदा प्रॅक्टिस करण्याचा उत्साह असल्याच्या भावनाही त्याने व्यक्त केला आहे.

दरम्यान या आजारामुळे कांबळीची तब्येत फारच खालावली असून त्यात लवकरात लवकर सुधारणा व्हावी अशी चाहत्यांनी प्रार्थनाही केली आहे. तसेच हॉस्पिटलमधून निघताना विनोद कांबळीमध्ये बरेच सकारात्मक बदलही दिसून आले.

विनोद कांबळीबद्दल अजून काही…

विनोद कांबळी भारतासाठी वनडे आणि टेस्ट सामने खेळला आहे. टीम इंडियासाठी 1991 मध्ये वनडेत डेब्यू केलं होतं. तर तो त्याचा शेवटचा वनडे सामना 2000 साली खेळला होता. विनोद कांबळीन कसोटीत सर्वात वेगाने 1000 धावांचा पल्ला गाठला होता. तसेच कमी वयात द्विशतक ठोकत प्रसिद्धी मिळवली होती. पण नंतर त्याचा फॉर्म घसरला आणि कमबॅक करणं कठीण झालं.