मुंबई : विराट कोहलीचे चाहते आणि पंच नितीन मेनन यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे. नितीन मेननच्या एका चुकीच्या निर्णयामुळे दिल्ली कसोटीत कोहलीला बाद होत तंबूत परतावं लागलं. त्यामुळे दीर्घ काळानंतर मोठी धावसंख्या उभारण्याचं विराट कोहलीचं स्वप्न हुकलं होतं. चौथ्या कसोटी सामन्यातही नितीन मेनन यांच्या एका निर्णयाने चाहते चांगलेच संतापले आहेत. तिसऱ्या दिवशी विराट कोहली 48 धावांवर असताना नाथन लायनच्या गोलंदाजीवर चेंडू मारला आणि दोन धावा घेत अर्धशतक पूर्ण केलं. पण या दोन धावांवरून मैदानात चांगलाच गोंधळ निर्माण झाला.
मैदानात उभ्या असलेल्या नितीन मेनन या पंचाला दोन धावांपैकी एक धाव शॉर्ट असल्याची शंका आली. त्यानंतर धाव शॉर्ट आहे की नाही हे तपासण्यासाठी टीव्ही पंचांकडे दाद मागितली. टीव्ही पंचांनी व्हिडीओ पाहिल्यानंतर धाव शॉर्ट नसल्याचं जाहीर केलं आणि विराट कोहली अर्धशतक झाल्याची बॅट झळकावली. मात्र विराटची धाव तपासण्याचं आवाहन हे ऑस्ट्रेलियाकडून करण्यात आलं होतं की मेनन यांनी हा कॉल घेतला हे स्पष्ट नाही.
.@imVkohli scores his first Test 50 since January 2022#ViratKohli? #INDvsAUSTest #BGT23 pic.twitter.com/MqAevSmGew
— Sportsresult (@Sportsresult12) March 11, 2023
तिसरा दिवस अखेर विराट कोहली 128 चेंडूत 59 धावा करून नाबाद आहे. पंच नितीन मेनन यांच्या या निर्णयानंतर विराट कोहलीच्या चाहत्यांनी चांगलंच धारेवर धरलं आहे. काही जणांनी तर विराट कोहलीचा शत्रू असल्याची जहरी टीका केली आहे. एका चाहत्याने लिहिलं आहे की, “मेनन साहेब विराट कोहलीला आउट करण्यासाठी आतापासूनच रणनिती आखत आहेत.”
According to Nitin menon:
Out Not Out pic.twitter.com/XOEtaPYeTu— AJAY (@ajay71845) March 1, 2023
Nitin Menon becomes machine when it comes to Kohli's errors. ?
— Silly Point (@FarziCricketer) March 11, 2023
तिसरा दिवसाचा खेळ संपला तेव्हा विराट कोहली नाबाद 59 आणि रविंद्र जडेजा नाबाद 16 धावांवर खेळत आहे. भारताने 3 गडी गमवून 289 धावा केल्या आहेत. अजूनही ऑस्ट्रेलियाकडे 191 धावांची आघाडी आहे. त्यामुळे चौथ्या दिवशी विराट कोहली आणि रविंद्र जडेजाला सावध खेळी करावी लागणार आहे. चौथ्या दिवशीचा खेळ लांबला तर हा सामना अनिर्णित ठरेल असंच चित्र आहे.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, मोहम्मद शमी आणि उमेश यादव.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | ट्रेव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ (कर्णधार), पीटर हँड्सकॉम्ब, कॅमरन ग्रीन, एलेक्स कॅरी, मिचेल स्टार्क, नाथन लायन, टॉड मर्फी आणि मॅथ्यू कुन्हेमन.