Virat Kohli-Anushka Sharma : कन्फर्म ! विराट लवकरच भारत सोडणार, कुटुंबासह कुठे होणार शिफ्ट ? कोचनीच थेट सांगितलं…

| Updated on: Dec 20, 2024 | 2:34 PM

क्रिकेटपटू विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्याबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून ते दोघं भारताबाहेर शिफ्ट होणार असल्याची चर्चा सुरू होती. आता त्याचसंदर्भात विराटचे लहानपणीपासूनचे कोच राजकुमार शर्मा यांनी एक विधान केलं आहे.

Virat Kohli-Anushka Sharma : कन्फर्म ! विराट लवकरच भारत सोडणार, कुटुंबासह कुठे होणार शिफ्ट ? कोचनीच थेट सांगितलं...
विराट कोहली - अनुष्का शर्मा
Image Credit source: instagram
Follow us on

भारतीय संघातील नामवंत क्रिकेटपटू विराट कोहली सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. सध्या तो बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये खेळत असून तिसऱ्या कसोटीत तो फारशी चांगली कामगिरी करू शकलेला नाही. याचदरम्यान विराट आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्याबद्दल एक महत्वाची बातमी समोर आली आहे. विराट अनुष्का बरेच वेळा लंडनमध्ये वेळ घालवताना दिसलेत, पण आता ते दोघं भारत सोडून बाहेरच्या देशातच शिफ्ट होणार असल्याचे वृत्त समोर आलं आहे. लौकरच ते दोघे हा निर्णय घेऊ शकतात, असे समजते. विराटला लहानपणापासून क्रिकेटचे कोचिंग देणारे त्याचे सर, कोच राजकुमार शर्मा यांनीच याबद्दल एक विधान करत ही बातमी कन्फर्म केली आहे. कोहली भारत सोडण्याच्या विचारात असल्याचे ते म्हणाले.

भारत सोडून लंडनमध्ये स्थायिक होणार विराट

विराट, अनुष्का हे दोघं वामिका आणि अकायसह लंडनमध्ये स्थायिक होऊ शकतात अशी चर्चा बऱ्याचा काळापासून सुरू होती. अकायच्या जन्मानंतर ते दोघेही मुलांसह अनेकदा लंडनमध्ये स्पॉटही झाले. मात्र त्यावर कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नव्हती. पण आता विराटच्या कोचनीच याबाबत वक्तव्य केल्याने ही बातमी जवळपास कन्फर्म झाली आहे. रिपोर्ट्सनुसार, एका मुलाखतीदरम्यान राजकुमार शर्मा यांना विराटच्या बाबतीत प्रश्न विचारण्यात आला होता.

विराट भारत सोडून कायमचा लंडनला शिफ्ट होण्याची योजना आखत आहे का ? असा प्रश्न राजकुमार यांना विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी स्पष्ट उत्तर दिलं. हो, विराट असा प्लान आखत आहे. तो लवकरच पत्नी अनुष्का आणि मुलं वामिका-अकायसोबत लंडनला शिफ्ट होईल, असं ते म्हणाले.

विराटचं घरं कुठे असेल ?

मूळचा दिल्लीकर असलेल्या विराटचं एक घर राजधानीत तर दुसरं घर मुंबईतही आहे. तसेच अलीबागमध्येही त्याने एक बंगला खरेदी केल्याचे वृत्त आहे. पण आता तो भारत सोडण्याचा विचार करत असून त्याचं नव घर लंडनमध्ये असू शकतं. मात्र यावर विराटने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

कोहलीच्या निवृत्तीबाबत काय म्हणाले कोच ?

विराटचे कोच राजकुमार शर्मा यांना विराटच्या निवृत्तीबाबतही प्रश्न विचारण्यात आले.बॉर्डर-गावसकर ट्रॉफीनंतर विराट निवृत्तीचा निर्णय घेणार का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. यावर राजकुमार शर्मा म्हणाले की असं अजिबात होणार नाही. विराट अजूनही तंदुरुस्त आहे. त्याचं अजून इतकं वय झालेल नाही. तो अजून 5 वर्ष सहज ( क्रिकेट) खेळू शकतो. तो 10 वर्षांचा होता, तेव्हापासून मी त्याला ओळखतो, त्याच्याकडे अजून बराच खेल आहे, असे कोच शर्मा म्हणाले.

विराट कोहली सध्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये खेळत आहे. मालिकेतील पहिल्या 3 कसोटी सामन्यांमध्ये मोठी खेळी म्हणून त्याच्या बॅटमधून फक्त 1 शतक झळकलं. पर्थ कसोटीच्या दुसऱ्या डावात त्याने नाबाद 100 धावा केल्या. या एका शतकासह त्याने 3 कसोटी सामन्यांच्या 5 डावात 126 धावा केल्या आहेत.

 

बरीच वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर 2017 साली विराट-अनुष्काने लग्न केलं. 2021मध्ये त्यांची मुलगी वामिकाचा जन्म झाला तर यावर्षी फेब्रुवारीमध्ये ( 2024) मुलगा अकायचा जन्म झाला. त्यानंतर ते दोघं बऱ्याच वेळेस लंडनमध्ये दिसले. विराट-अनुष्काने त्यांच्या दोन्ही मुलांना आत्तापर्यंत मीडियासमोर आणलेलं नाहीये.