दुबई : दिल्ली कॅपिट्ल्सने (Delhi Capitals) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर (Royal Challengers Banglore) 59 धावांनी दणदणीत विजय मिळवला. बंगळुरुकडून विराट कोहलीचा (Virat Kohli) अपवाद वगळता इतर कोणत्याही खेळाडूला विशेष काही करता आले नाही. विराटने 43 धावांची खेळी. विराटला बंगळुरुला विजय मिळवून देता आला नाही. पण विराटने या सामन्यादरम्यान एक विराट विक्रम केला आहे. अशी कामगिरी करणारा विराट हा पहिला भारतीय तर क्रिकेट विश्वातील सातवा फलंदाज ठरला आहे. (Virat Kohli Complete 9000 Run In T 20)
दिल्ली विरुद्धच्या खेळीत 10 धावा पूर्ण करताच विराटच्या नावावर या विक्रमाची नोंद झाली. विराट टी 20 क्रिकेटमध्ये 9 हजार धावा पूर्ण करणारा पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे. विराटच्या नावावर ताज्या आकडेवारीनुसार टी 20 क्रिकेटमध्ये 9 हजार 33 धावांची नोंद झाली आहे. विराटने 285 सामन्यातील 271 डावात ही कामगिरी केली आहे. विराटने 5 शतकं, 65 अर्धशतक, 817 चौकार आणि 289 सिक्सच्या मदतीने हा 9 हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. विराटची टी 20 मधील 113 ही सर्वोच्च धावसंख्या आहे. विराटनंतर टी 20 मध्ये सर्वाधिक धावांच्या भारतीय फलंदाजांच्या यादीत हिटमॅन रोहित शर्मा आणि मिस्टर आयपीएल सुरेश रैनाचा नंबर लागतो.
रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नावावर टी 20 मध्ये 8 हजार 818 धावांची नोंद आहे. रोहितने 333 सामन्यातील 320 डावात ही किमया केली आहे. यात रोहितने 6 शतकं आणि 62 अर्धशतकं लगावले आहेत. तसेच रोहितने 776 चौकार आणि 372 सिक्स लगावले आहेत. तर 118 ही रोहितची टी 20 मधील सर्वोच्च खेळी आहे. मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) आयपीएलच्या (IPL 2020) साखळी फेरीतील 9 सामने खेळायचे आहेत. त्यामुळे रोहितला टी 20 मध्ये 9 हजार धावा पूर्ण करण्याची नामी संधी आहे.
सुरेश रैना (Suresh Rain) टी 20 स्पेशालिस्ट खेळाडू आहे. रैनाने टी 20 च्या 319 सामन्यातील 303 डावात 8 हजार 392 धावा केल्या आहेत. यामध्ये रैनाने 4 शतकं आणि 51 अर्धशतकं लगावली आहेत. यात रैनाने 760 फोर आणि 311 सिक्स झळकावले आहेत. रैनाची नाबाद 126 ही सर्वोच्च खेळी ठरली आहे. दरम्यान रैनाने आयपीएलच्या 13 व्या मोसमातून वैयक्तिक कारणामुळे माघार घेतली आहे.
संबंधित बातम्या :
विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघात ‘आदित्य ठाकरे’!
(Virat Kohli Complete 9000 Run In T 20)