भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) आशिया चषकात (Asia Cup 2022) आत्तापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. म्हणून त्याचं सर्वत्र कौतुक होतं आहे. मागच्या झालेल्या तिन्ही सामन्यात कोहलीने चांगली फलंदाजी केली आहे. सद्या त्यांच्याकडून अधिक धावा होत असल्याने त्याची चर्चा सगळीकडे आहे. विराट कोहलीने काल एक वक्तव्य केलं आहे. त्यावर सोशल मीडियावर (Social Media) अधिक चर्चा देखील सुरु झाली आहे.
पाकिस्तान विरुद्ध झालेल्या सामन्यात कोहलीने 44 बॉलमध्ये 60 धावा केल्या, परंतु त्यानंतरही भारताला रविवारी झालेला सामना जिंकता आला नाही. आत्तापर्यंत कोहलीने तीन सामन्यांमध्ये दोन अर्धशतकी पारी खेळली आहे.
ज्यावेळी भारताचा पराभव झाला त्यावेळी विराट कोहलीने एक मोठ वक्तव्य केलं आहे. मी ज्यावेळी माझ्या कर्णधार पदाचा राजीनामा दिला. त्यावेळी मला संघातील कोणीही फोन केला नाही. फक्त महेंद्र सिंग धोनीचा मॅसेज आला होता.
कोहलीच्या त्या विधानावरती बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी उत्तर दिलं आहे, ते म्हणतात की प्रत्येकवेळी कोहलीला आम्ही मदत केली. परंतु आता तो कोणत्या विषयावर बोलत आहे आम्हाला माहित नाही. एका अधिकाऱ्याने खासगी वाहिनीला मुलाखत देताना सांगितले की, त्यांचा विराटला संघातील सगळ्या खेळाडूंनी मदत केली आहे.
विराटला कोणी मदत केली नाही ही चुकीची गोष्ट आहे, बीसीसीआयचंच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी सुद्धा त्याला मदत केली आहे. ज्यावेळी त्याने कर्णधार पद सोडलं त्यावेळी त्याला बीबीसीने सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या होत्या.