16 ऑक्टोबरपासून (October) सुरु होत असलेल्या विश्वचषक स्पर्धेसाठी (T20 World Cup) टीम इंडिया ऑस्ट्रेलियाला (Australia) रवाना झाली आहे. काही दिवसात त्यांच्या वार्म अप मॅचेस सुरु होणार आहेत. त्यामुळे टीम इंडियाच्या खेळाडूंचा चांगला सराव होईल. याआगोदर झालेल्या ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिकेविरुद्धची मालिका जिंकल्यामुळे टीम इंडियाच्या खेळाडूंना अधिक विश्वास आहे.
Mission Melbourne @imVkohli ❤ #ViratKohli #T20WorldCup2022 #indiancricketteam pic.twitter.com/CsoYv6NmTK
हे सुद्धा वाचा— Mufaddal vohra (@ayushviratian) October 6, 2022
टीम इंडियाचे खेळाडू ज्यावेळी ऑस्ट्रेलियात पोहोचले, त्यावेळी त्यांचे फोटो काढण्यात आले. विराट कोहली, रोहित शर्मा, दिनेश कार्तिक, सूर्यकुमार यादव, के एल राहुल, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या और युजवेंद्र चहल इत्यादी खेळाडूंचे फोटो व्हायरल झाले आहेत.
विराट कोहलीचा सूट-बूट घातलेला फोटो सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाला आहे. त्यामुळे त्याची अधिक चर्चा आहे. तसेच विराट कोहलीने हेअर स्टाईल सुद्धा वेगळी केली आहे. सध्या विराट चांगल्या फॉर्ममध्ये असल्यामुळे तो चांगली कामगिरी करेल.