मुंबई : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिका संपल्यानंतर विराट कोहलीच्या तब्येतीबाबत वावड्या उठल्या आहेत. त्यामुळे क्रीडाप्रेमींमध्ये चिंता पसरली आहे. चौथ्या सामन्याच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव सुरु असताना विराट कोहली मैदानात उतरला नाही. त्याच्या ऐवजी सूर्यकुमार यादवने मैदानात क्षेत्ररक्षण केलं. विराटनं या सामन्यात 186 धावांची केळी केली. जवळपास तीन वर्षानंतर विराटने कसोटीत शतक झळकावलं. कोहलीने जवळपास 8 तास मैदानात घाम गाळत टीमसाठी धावा करत राहिला. अखेर टीम इंडियाला पहिल्या आघाडी मिळवण्यात यश आलं. हा सामना ड्रॉ झाला आणि भारताने 2-1 ने मालिका जिंकली. इतकंच काय तर टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट कसोटीच्या अंतिम सामन्यात पोहोचली आहे.
या सामन्यात विराटला ताप आला होता. मात्र त्याने याबाबत जराही कल्पना लागू दिली नाही. पूर्ण ताकदीनीशे तो या सामन्यात खेळला. विराट कोहली आजारी असल्याची माहिती त्याच्या पत्नीनं दिली. तसेच इन्स्टाग्रामवर इमोशनल पोस्ट शेअर केली होती. शांतपणे तापासोबत खेळ. तू मला कायमच प्रेरणा देतो असं तिने लिहिलं होतं.
चौथ्या दिवशीचा खेळ संपल्यानंतर अक्षर पटेलला विराटच्या प्रकृतीबाबत विचारलं असता त्याने सांगितलं, “मला माहित नाही. तो धावा काढताना एकदम व्यवस्थित होता. तसेच फलंदाजी करताना मला तसं काही जाणवलं नाही.” अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील 75 वे शतक झळकावले. चौथ्या कसोटीच्या पहिल्या डावात विराटने 186 धावा केल्या. अवघ्या 14 धावांमुळे विराट शतकापासून तो वंचित राहिला.
कर्णधार रोहित शर्माने सोशल मीडियावर उडत असलेल्या अफवांवर पडदा टाकला आहे. “मला वाटत नाही तो आजारी आहे. तो थोडासा खोकत असल्याचं दिसलं. त्यामुळे त्याची तब्येत बिघडली आहे असं काही नाही. सोशल मीडियावरील बातम्यांवर विश्वास ठेवू नका.”, असं कर्णधार रोहित शर्माने सांगितलं.
विराटने शतकी खेळी करत टीम इंडियाच्या माजी कर्णधाराच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. विराटने लिटील मास्टर सुनील गावसकर याच्या विक्रमाची बरोबरी केलीय. विराटचं ऑस्ट्रेलिया विरुद्धचं आठवं शतक आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध सर्वाधिक कसोटी शतक ठोकण्याचा विक्रम हा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. तर त्या खालोखाल आता सुनील गावसकर आणि विराट कोहली 8 शतकांसह संयुक्तरित्या दुसऱ्या क्रमांकावर आहेत. विशेष बाब म्हणजे ऑस्ट्रेलिया विरुद्ध सर्वाधिक कसोटी शतक असणारा विराट हा पहिला सक्रिय भारतीय आहे.
दोन्ही संघांचे खेळाडू
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, मोहम्मद शमी आणि उमेश यादव.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | ट्रेव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ (कर्णधार), पीटर हँड्सकॉम्ब, कॅमरन ग्रीन, एलेक्स कॅरी, मिचेल स्टार्क, नाथन लायन, टॉड मर्फी आणि मॅथ्यू कुन्हेमन.